TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

उत्तर प्रदेशसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगुल लवकरच; फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये मतदानाची शक्यता

उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये एकत्रित निवडणुकांची तयारी; मतदारयादीच्या प्रक्रियेलाही वेग

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशसह उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा धुरळा लवकरच उडण्याची शक्यता आहे. या सर्व राज्यांमध्ये फेब्रुवारी ते मार्च २०२७ या कालावधीत विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांवर जनगणना तसेच निवडणूक कामांचा एकाच वेळी प्रशासकीय ताण येऊ नये, यासाठी निवडणुका आणि जनगणनेच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. पाच राज्यांपैकी मणिपूर विधानसभेचा कार्यकाळ १३ मार्च २०२७ रोजी सर्वप्रथम संपत आहे. त्यामुळे त्याआधीच पाचही राज्यांतील निवडणूक प्रक्रिया एकत्रितपणे पूर्ण करण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून तयारी केली जाण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ २२ मे २०२७ रोजी संपणार असला तरी प्रशासकीय सोयीसाठी कार्यकाळ संपण्याच्या सुमारे दोन महिने आधीच राज्यात मतदान प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते.

२०२२ प्रमाणे पाचही राज्यांत एकत्र निवडणुका?

२०२२ मध्ये या पाचही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या होत्या. २०२७ मध्येही पाचही राज्यांच्या निवडणुका एकाच कालावधीत घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणूक आयोग पारंपरिक पद्धतीनुसार, संबंधित विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी निवडणुका घेऊ शकतो.

घटनात्मक अधिकारांनुसार, निवडणूक आयोगाला विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने आधीपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची मुभा आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातही कार्यकाळ संपण्याच्या बराच आधी मतदान घेण्याचा पर्याय आयोगासमोर असू शकतो.

हेही वाचा –  महाप्रसाद, भंडाऱ्यावर निर्बंध? तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर मंदिर महासंघाचा आक्षेप

यूपीमध्ये अनेक टप्प्यांत मतदानाची शक्यता

उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असल्याने येथे मतदान अनेक टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. मात्र, बिहार आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या पद्धतीचा विचार करता यावेळी तुलनेने कमी टप्प्यांत मतदान घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणूक आयोगाने बिहारप्रमाणे उत्तर प्रदेशातील मतदान दोन टप्प्यांत घेण्याचा निर्णय घेतल्यास फेब्रुवारी किंवा मार्चच्या सुरुवातीपासून मतदानाला सुरुवात होऊ शकते.

मतदारयादीच्या प्रक्रियेलाही वेग

निवडणूक होणाऱ्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर उर्वरित दोन राज्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयोगाकडून SIR प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.

SIR प्रक्रियेनंतर उत्तर प्रदेशातील मतदारांची संख्या १३.२ टक्क्यांनी घटली आहे. गोव्यात मतदारसंख्या १०.२ टक्क्यांनी, तर मणिपूरमध्ये ७.६ टक्क्यांनी कमी झाली आहे. पंजाब आणि उत्तराखंडच्या अंतिम मतदार याद्या पुढील काही महिन्यांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे पाचही राज्यांतील अंतिम मतदार याद्या, प्रशासकीय तयारी आणि जनगणनेचे वेळापत्रक यांचा समन्वय साधून २०२७च्या सुरुवातीला विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आता वाढली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group