Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

केतन अगरवाल खून प्रकरणात तिसऱ्या आरोपीला बेड्या; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

पुणे | केतन अगरवाल हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी रितेश हंगे या आणखी एका आरोपीला अटक केली. हा आरोपी चेतन चौधरीचा मित्र असून, त्याला खुनाच्या कटाची माहिती होती. या कटात तो सामील झाल्याचा आरोप असून, न्यायालयाने त्याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

केतन अगरवाल याची १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात केतनची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली. दोघे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

चेतन आणि सियाचे मोबाइल संच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तांत्रिक तपासात चेतन आणि सिया यांच्यात समाजमाध्यमात झालेले संभाषण काढून (डिलिट) टाकण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संंबंधित संभाषण पुन्हा (चॅट रिकव्हर) मिळवले. तेव्हा रितेशसोबत चेतनने केतनच्या हत्येबाबत चर्चा केल्याचे उघडकीस आले. केतनची हत्या कशी करायची, याबाबत रितेशने चेतनला काही माहिती दिली होती.

हेही वाचा

गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज!

चेतन आणि सियाने १८ जून रोजी रितेशला लोहगडावर येण्यास सांगितले होते. मात्र, रितेशने त्यांना नकार दिला होता. केतनच्या हत्येपूर्वी रितेश चेतनच्या संपर्कात होता. हत्येनंतर चेतनने रितेशची भेट घेतली होती, तसेच सियाही त्याच्या संपर्कात होती, अशी माहिती तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. रितेशला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. रितेश मूळचा बीड जिल्ह्यातील असून, बालेवाडीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. पोलिसांनी या प्रकरणात त्याला ताब्यात घेऊन यापूर्वी चौकशी केली होती.

‘रितेशला हत्येच्या कटाची माहिती होती. तो प्रत्यक्ष कट रचण्यात सामील होता का नाही, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. पोलीस कोठडीत त्याची चौकशी केल्यानंतर या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे मिळतील,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button