TOP News । महत्त्वाची बातमीBreaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीत मोठी दुर्घटना: ५ मजली इमारत कोसळली; युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

नवी दिल्ली | देशाच्या राजधानीतील सत्य निकेतन भागात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास एक पाच मजली निवासी इमारत अचानक पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून दिल्ली अग्निशामक दल, एनडीआरएफ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वेगाने बचावकार्य हाती घेतले आहे.

दक्षिण-पश्चिम दिल्लीचे पोलीस उपायुक्त अमित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १:३४ वाजता नानकपुरा गुरुद्वाजवळील एक इमारत कोसळल्याचा पीसीआर कॉल पोलिसांना मिळाला. कोसळलेली इमारत विद्यार्थ्यांचे वसतिगृह (हॉस्टेल) म्हणून वापरली जात होती आणि तिथे अनेक विद्यार्थी भाड्याने राहत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाच्या किमान आठ गाड्या आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) पथक तातडीने पाचारण करण्यात आले आहे.

हेही वाचा

JNU प्राध्यापकावर १० विद्यार्थिनींचे लैंगिक शोषणाचे आरोप; अंतर्गत चौकशी समितीकडून तपास सुरू

इमारत कोसळल्याने झालेल्या प्रचंड आवाजाने परिसरात घबराट पसरली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली रस्त्यावर पार्क केलेली अनेक वाहने दबून पूर्णपणे निकामी झाली आहेत. मदतकार्यात प्रशासनासोबतच स्थानिक नागरिकही पुढे सरसावले असून ढिगारा उपसण्यासाठी मदत करत आहेत.

बचाव पथकांनी आतापर्यंत ढिगाऱ्याखालून दोघांना सुरक्षित बाहेर काढून तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. ढिगाऱ्याखाली नेमके आणखी किती लोक अडकले आहेत याची अचूक माहिती अद्याप मिळालेली नसून, सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शोधमोहीम वेगाने सुरू आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button