Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नरडवे प्रकल्पबाधित १५२ कुटुंबांना ६.८३ कोटींचे अनुदान मंजूर; स्वेच्छा पुनर्वसनाला गती

नरडवे, जांभळगाव, भैरवगाव, यवतेश्वर आणि दुगनगरमधील कुटुंबांना लाभ; नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी एकूण ६ कोटी ८३ लाख १ हजार ८८७ रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणी विशेष पाठपुरावा केल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे नरडवे, जांभळगाव, भैरवगाव, यवतेश्वर आणि दुगनगर ही पाच गावे बाधित झाली आहेत. या पाच गावांतील एकूण ९६१ प्रकल्पबाधित कुटुंबांपैकी १५२ कुटुंबांनी स्वेच्छा पुनर्वसनाचा पर्याय स्वीकारला आहे. या कुटुंबांसाठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदानात घरांसाठी ६ कोटी ५५ लाख १५ हजार ७२० रुपये, तर जमिनीबाबत २७ लाख ८६ हजार १६७ रुपये अनुदानाचा समावेश आहे.

या निर्णयाचा सर्वाधिक लाभ नरडवे गावातील ८४ कुटुंबांना मिळणार आहे. याशिवाय जांभळगावमधील १६, भैरवगावमधील २, यवतेश्वरमधील ४ आणि दुगनगरमधील ४६ कुटुंबांचा यात समावेश आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 4 सप्टेंबरला कोकण-गोव्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

मंजूर अनुदानाची रक्कम सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पबाधित कुटुंबांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होणार आहे. तसेच नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम नियोजनानुसार पूर्ण करण्यासही या निर्णयामुळे हातभार लागणार आहे.

प्रकल्पबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यांना न्याय्य आणि वेळेत मदत मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. १५२ कुटुंबांना मंजूर झालेल्या या अनुदानामुळे त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळून मोठा दिलासा मिळणार असल्याचे मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group