ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

भोसरी येथील शिक्षणतज्ज्ञ शिवलिंग दवळेश्वर सरांना ‘समाजभूषण’ पुरस्कार प्रदान

शरद पवार यांच्या हस्ते बिबवेवाडीत विशेष सन्मान

​पुणे | कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवणारे भोसरीतील संत साई हायस्कूलचे संस्थापक व मुख्याध्यापक शिवलिंग नीलकंठ दवळेश्वर यांना गुरुवारी ‘समाजभूषण विशेष सन्माना’ने गौरविण्यात आले. लिंगायत संघर्ष समिती आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात हा भव्य सत्कार सोहळा पार पडला.

ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांच्या शुभहस्ते शिवलिंग दवळेश्वर सरांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ‘लिंगायत समाज गौरव व स्मृती गौरव स्मरणिके’चे विमोचनही मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कर्नाटकातून येऊन महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात उभे केलेले संस्थात्मक कार्य आणि भावी पिढ्यांच्या जडणघडणीतील योगदान अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार यावेळी वक्त्यांनी काढले.

न

हेही वाचा

बेल्जियमचे प्रधानमंत्री बार्ट डी वेव्हर आणि शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

या दिमाखदार सोहळ्यास पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प. सदगुरु गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय लिंगायत व वीरशैव समाजातील नागरिक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दवळेश्वर सरांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल संत साई स्कूल परिवार आणि आदिनाथ नगर (भोसरी) परिसरातून त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group