Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना मारहाण

पुणे | गणेशोत्सवासह सार्वजनिक सणांमध्ये डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने लावून धरणारे पुण्यातील नागरिक विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ‘टीव्ही ९’ वृत्तवाहिनीशी थेट संवाद साधत असताना काही अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या संपूर्ण प्रकारानंतर पुणे पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

या घटनेनंतर विद्यानंद बापट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घडलेला प्रकार सांगितला. ते म्हणाले, “मी वृत्तवाहिनीशी शांततेत संवाद साधत असताना अचानक काही टवाळखोर तिथे आले आणि त्यांनी मला बोलण्यापासून रोखले. त्यांना माझी भूमिका मान्य नसावी. मी पूर्णपणे निशस्त्र होतो, याचाच गैरफायदा घेत त्यांनी माझ्यावर हात उचलला. ज्यांच्याकडे मुद्द्यांना मुद्द्याने उत्तर देण्याची क्षमता नसते, तेच अशा प्रकारे हिंसेचा मार्ग निवडतात. मारहाण करणाऱ्यांना केवळ सवंग प्रसिद्धी हवी होती आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.”

हेही वाचा

विदर्भात पावसाचा जोर वाढणार; गोंदिया आणि अमरावतीला ‘ऑरेंज अलर्ट’

आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करताना बापट म्हणाले, “मला कोणत्याही प्रकारची सवंग प्रसिद्धी नको आहे. माझा हिंदू सणांना किंवा गणेशोत्सवाला कधीही विरोध नव्हता आणि आजही नाही; माझा आक्षेप फक्त डीजेच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाला आणि ध्वनीप्रदूषणाला आहे. अशा हल्लेखोरांकडे मी दुर्लक्ष करतो.” दरम्यान, कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजच्या आधारे पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button