TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी १० ते १७ सप्टेंबरदरम्यान विशेष शिबिरे; ८ जिल्ह्यांत नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय; पात्र नागरिकांच्या जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रक्रियेला मिळणार गती

छत्रपती संभाजीनगर : मराठा, कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र तसेच जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी विभागातील आठही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये १० ते १७ सप्टेंबरदरम्यान मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मंडळ स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

अर्जदारांच्या अडचणींचे शिबिरात निराकरण

या विशेष शिबिरांमध्ये कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील पात्र नागरिकांच्या जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्राशी संबंधित अडचणी सोडवण्यात येणार आहेत. अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी करून पात्र नागरिकांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीची प्रक्रिया पारदर्शक तसेच गतिमान ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शिबिरांच्या माध्यमातून प्रलंबित अर्ज आणि नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा –  महाप्रसाद, लंगर, भंडाऱ्यांतील अन्नावर FDAची नजर; तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय

शिबिरांची माहिती स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करण्याचे आदेश

प्रत्येक शिबिराची तारीख, वेळ आणि ठिकाण याची माहिती ग्रामपंचायत, नोटीस बोर्ड तसेच स्थानिक माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र नागरिकांना संबंधित शिबिरात उपस्थित राहून आपल्या अर्जाशी संबंधित अडचणी मांडता येणार आहेत.

शिबिरतील दैनंदिन कामकाजाचा अहवाल संबंधित नोडल अधिकाऱ्याने विभागीय कार्यालयाकडे सादर करावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. ही मोहीम सर्वोच्च प्राधान्याने राबवून आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

नोडल अधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी

विशेष शिबिरांच्या माध्यमातून जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्राशी संबंधित अडचणींचे निराकरण करण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.

नोडल अधिकाऱ्यांना प्रामुख्याने पुढील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत :

-जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीसंदर्भातील अडचणींचे निराकरण करणे.

-प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे.

-जात प्रमाणपत्र व पडताळणीसंदर्भातील तक्रारींचा दररोज आढावा घेणे.

-तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जात पडताळणी समिती यांच्यात समन्वय साधणे.

-प्रलंबित प्रकरणांचा अहवाल दर सोमवारी संबंधित कार्यालयांना सादर करणे.

-पात्र नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कार्यवाही जलदगतीने पूर्ण करणे.

मराठा, कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील पात्र नागरिकांच्या प्रमाणपत्र प्रक्रियेला गती देण्यासाठी मंडळ स्तरावर आयोजित करण्यात येणारी ही विशेष शिबिरे महत्त्वाची ठरणार आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button