“आता युद्धाच्या समाप्तीकडे वळलं पाहिजे”; पंतप्रधान मोदींचे पुतिन यांना युद्ध थांबवण्याचे थेट आवाहन

नवी दिल्ली | रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला जवळपास चार वर्षे पूर्ण होत आली तरी अद्याप दोन्ही देशांमधील संघर्ष थांबलेला नाही. दोन्ही बाजूंकडून सातत्याने होणारे हवाई हल्ले आणि वाढत्या तणावाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जागतिक पातळीवर युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न झाले, मात्र त्यावर तोडगा निघालेला नाही. या पार्श्वभूमीवर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हे युद्ध तातडीने संपवण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे.
किर्गिस्तान येथे आयोजित शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेदरम्यान ३१ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा शांततेचा संदेश देत, रशिया-युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व शांततापूर्ण प्रयत्नांना भारताचा पूर्ण पाठिंबा राहील, असा पुनरुच्चार केला.
Had extensive discussions with President Putin. Discussed the full range of the India-Russia Special and Privileged Strategic Partnership. It is gladdening to see significant progress across various sectors in recent years.
Focus areas for the India-Russia friendship remain… pic.twitter.com/tclMVJ72KS
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2026
हेही वाचा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये मनाई आदेश
“युद्ध प्रत्येक दिवशी मानवतेला मागे नेत आहे”: पंतप्रधान मोदी
द्विपक्षीय चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याच्या भारताच्या कटिबद्धतेवर भर दिला. पुतिन यांच्याशी संवाद साधताना ते म्हणाले, “युक्रेनच्या मुद्द्यावर आपण यापूर्वीही सातत्याने चर्चा केली आहे. भारत शांततेसाठी होणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचे कायम समर्थन करतो. युद्धात जाणारा प्रत्येक दिवस मानवतेला मागे नेतो, तर शांततेच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल नवी आशा निर्माण करते.”
ते पुढे म्हणाले की, “अनंत काळापर्यंत चालणाऱ्या युद्धाकडून आता आपण युद्धाच्या समाप्तीकडे वाटचाल केली पाहिजे. सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर शांततापूर्ण तोडगा काढणे हीच काळाची आणि मानवतेची हाक आहे. हाच भारताचा संदेश आहे. महात्मा गांधी आणि भगवान बुद्धांची ही भूमी जगाला केवळ एकाच मार्गाची शिकवण देते, तो म्हणजे शांततेचा मार्ग.” या आवाहनामुळे युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक शांततेसाठी भारताची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.





