आकुर्डी येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषदेचे आयोजन

पिंपरी- चिंचवड : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये दिनांक 3 आणि 4 सप्टेंबर 2026 रोजी IEEE International
conference on Electronics, Computing, Communication and Networking Automation टेकनॉलॉजिस (ICEC2NT-2026) चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे प्राचार्या डॉ. पी मालती यांनी दिली.
तब्बल 250 शोधनिबंध या कॉन्फरन्स मध्ये सादर केले जाणार आहेत. भारताच्या विविध राज्यातून विद्यार्थी,
प्राध्यापक आणि संशोधक, तसेच अमेरिका, सौदी अरेबिया व इराक या देशातील विविध रिसर्च स्कॉलर्स आपले संशोधन या कॉन्फरन्स मध्ये सादर करणार आहेत.
सदर परिषदेसाठी डॉ. मनीष बाली आणि श्री मयूर कौलवकर बंगळुरू, साउथ फ्लोरिडा अमेरिकेवरून प्रा. भुवन उन्हेलकर, वेल्स विद्यापीठ युनायटेड किंगडम वरून प्रा. इझेंडू अरिवा, फिलिप्स इंडिया चे डायरेक्टर श्री आशिष शहा , VJTI मुंबई चे प्रा. डॉ. फारुख काझी, IEEE पुणे चे प्रमुख डॉ अमर बुचडे, तसेच संस्थेचे विश्वस्त माननीय श्री तेजस पाटील यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेची २ सप्टेंबरची विशेष सभा बेकायदेशीर : राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल
वरील सर्व मान्यवारांच्या उपस्थिती मुळे कॉन्फरेन्स मध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन कल्पना, संशोधन आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होईल. सॉफ्ट ब्रॅंचेस जसे की कॉम्प्युटर, IT, याचा उपयोग Core branches जसे की इलेक्ट्रॉनिक्स आणि Instrumentation Engg मधील विद्यार्थ्यांना निश्चित होईल असे प्रतिपादन कॅम्पस डायरेक्टर Rear Admiral अमित विक्रम यांनी केले.
प्रा. डॉ. पी. मालती, प्रा डॉ बी बी मुसमाडे, प्रा डॉ ऋतुजा देशमुख आणि प्रा डॉ प्रिती पाटिल हे कॉन्फरन्सचे संयोजक म्हणून काम
पाहत आहेत.
सदर परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी, डी वाय पाटील आकुर्डी संकुला चे चेअरमन मा. सतेज पाटील, डॉ. डी
वाय पाटील प्रतिष्ठानचे विश्वस्त मा. तेजस पाटील, सौ. स्नेहा तेजस पाटील, आणि डॉ. डी वाय पाटील शैक्षणिक संकुलनाचे संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
प्राचार्या डॉ. सौ. पी. मालती





