TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

इमरान हाश्मीला स्वाइन फ्लू; H1N1 रिपोर्ट पॉझिटिव्ह, बंगळुरूचा कार्यक्रम केला रद्द

‘आवारापन 2’च्या यशानंतर इमरानची प्रकृती बिघडली; सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांची मागितली माफी, म्हणाला ‘12 सप्टेंबरला नक्की भेटेन’

मुंबई : ‘आवारापन 2’च्या जबरदस्त यशामुळे अभिनेता इमरान हाश्मी सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 220 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याचदरम्यान इमरानच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. इमरानची प्रकृती बिघडली असून त्याचा H1N1 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू असून त्याला पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे इमरानला बंगळुरूमधील एका नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. कार्यक्रमाला उपस्थित राहता न आल्याने त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची माफी मागितली आहे.

इमरानला स्वाइन फ्लूची लागण

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या एक-दोन दिवसांपासून इमरान हाश्मीची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्याने H1N1 चाचणी करून घेतली. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. औषधोपचारांसोबतच पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे त्याला बंगळुरूमधील कार्यक्रमाला जाता आले नाही.

हेही वाचा –  मनोज जरांगेंचा शिंदेसेनेच्या शेतकरी मेळाव्याला विरोध; ‘मेळावा रद्द करा, अन्यथा परभणीत येईन’

पिक्चर अभी खत्म नहीं हुआ है…’

इमरानने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत बंगळुरूमधील चाहत्यांची माफी मागितली. त्याने लिहिले, “बंगळुरूमधील सर्व प्रिय लोकांची माफी मागतो. तब्येत खराब असल्यामुळे मी कार्यक्रमाचा भाग होऊ शकलो नाही. पण पिक्चर अभी खत्म नहीं हुआ है… तो फक्त पोस्टपोन झालाय. 12 सप्टेंबरला मी नक्की तुमच्यासोबत असेन.”

इमरानच्या या पोस्टनंतर त्याचे चाहते त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत असून, सोशल मीडियावर त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

आवारापन 2’नंतर ‘गन मास्टर जी9’ची उत्सुकता

दरम्यान, ‘आवारापन 2’मधून इमरानने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटाच्या यशानंतर आता त्याच्या आगामी ‘गन मास्टर जी9’ या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर यापूर्वीच प्रदर्शित झाला असून इमरानच्या नव्या अवताराची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

‘गन मास्टर जी9’ हा चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे एकीकडे चाहते इमरानच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत, तर दुसरीकडे त्याच्या आगामी सिनेमातील नव्या भूमिकेचीही उत्सुकता कायम आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button