ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभाग क्रमांक ८ मधील जनसंवाद’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद..!

नागरिकांचा थेट लोकप्रतिनिधींशी संवाद; स्थानिक प्रश्नांच्या तातडीच्या निराकरणाचे आश्वासन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न समजून घेऊन ते प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी प्रभाग क्रमांक ८ मध्ये ‘जनसंवाद’ उपक्रम राबविण्यात आला. चिखली प्राधिकरणातील राजमाता जिजाऊ नगर, सेक्टर क्रमांक ११ व १३ परिसरातील विविध सोसायट्यांच्या प्रतिनिधींशी नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी थेट संवाद साधत नागरिकांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी प्रभाग क्रमांक आठ मधील नगरसेविका नम्रता लोंढे, अश्विनी वाबळे, नगरसेवक तुषार सहाणे, माजी नगरसेवक संजय वाबळे तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवराज लांडगे, योगेश लोंढे आणि परिसरातील नागरिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या बैठकीत परिसरातील विविध सोसायटी प्रतिनिधींनी स्थानिक पातळीवरील प्रश्न मांडले. नागरिकांनी आपल्या भागातील मूलभूत सुविधा, पायाभूत विकास, वाहतूक, सुरक्षा तसेच महानगरपालिका व प्राधिकरणाशी संबंधित विविध विषयांकडे नगरसेवकांचे लक्ष वेधले.

नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी गांभीर्याने दखल घेत केवळ समस्या ऐकून न थांबता, संबंधित विभागांशी समन्वय साधून त्यावर ठोस उपाययोजना करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

हेही वाचा –शेतीला AI आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; उत्पादन खर्च ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा फडणवीसांचा निर्धार

चिखली प्राधिकरण परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण होत असून, नव्या सोसायट्या आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांना सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा ‘जनसंवाद’ उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून लोकप्रतिनिधीची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत असल्याचे या बैठकीतून अधोरेखित झाले. नागरिकांनीही आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधीसमोर मांडता येत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

‘जनसंवादातून समस्या समजून घेणे आणि समन्वयातून त्या सोडवणे’ या भूमिकेतून प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याचा निर्धार यावेळी नगरसेवक डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“नागरिकांनी मांडलेले प्रश्न हेच आपल्या विकासकामांचे प्राधान्यक्रम आहेत. प्रत्येक समस्या संबंधित विभागापर्यंत पोहोचवून त्याच्या निराकरणासाठी पाठपुरावा केला जाईल. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आणि पोलीस प्रशासन यांच्याशी समन्वय साधून आवश्यक ती तातडीची कार्यवाही करण्यात येईल.”

– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button