TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

धाराशिवच्या राजकारणात निंबाळकर बंधू आमनेसामने; मकरंदराजेंचे ओमराजेंना थेट आव्हान

‘मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी’; पक्षांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले

धाराशिव : धाराशिवच्या राजकारणात शिवसेना ठाकरे गटाला लागलेल्या गळतीनंतर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात त्यांचेच बंधू मकरंदराजे निंबाळकर आक्रमक झाले आहेत. मकरंदराजे यांनी ओमराजे यांच्यासह आमदार राणा पाटील यांच्यावर निशाणा साधत थेट आव्हान दिले आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांनीही शिंदे गटाची वाट धरली, तर कळंबमधील काही नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर मकरंदराजे निंबाळकर यांनी ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा पाटील यांच्यावर टीका केली. ठाकरे गटाच्या नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्यांना फोडण्याची गरज नव्हती, असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा –  शिल्पा गवारे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात; मुख्यमंत्री फडणवीसांची कुटुंबीयांना मोठी ग्वाही

मशाल चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान मकरंदराजे यांनी दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे धाराशिवच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

मकरंदराजे निंबाळकर यांनी शिवसैनिकांबाबतही आक्रमक भूमिका घेतली. आपल्या शिवसैनिकांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे आगामी काळात धाराशिवमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निंबाळकर कुटुंबातील या राजकीय संघर्षामुळे धाराशिवच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. पक्षांतर, स्थानिक नेत्यांची भूमिका आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मकरंदराजे यांच्या आरोपांना ओमराजे निंबाळकर काय उत्तर देतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button