Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

कानपूरमध्ये प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; दोन वैमानिकांचा मृत्यू

Kanpur Plane Crash | उत्तर प्रदेशातील कानपूर येथे गुरुवारी सकाळी एक खासगी प्रशिक्षणार्थी विमान कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत विमानातील मुख्य वैमानिक आणि सह-वैमानिक अशा दोघांचाही मृत्यू झाला आहे. गंगा नदीच्या काठावर असलेल्या एका शेतात हे विमान कोसळले. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

कानपूरमधील ‘गर्ग एव्हिएशन’ या खासगी प्रशिक्षण संस्थेचे हे विमान होते. गंगा नदीच्या किनाऱ्यालगत विमान कोसळल्याचे पाहताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त विमानातून वैमानिक आणि सह-वैमानिक यांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज; ‘सेहवाग-द्रविड’ जोडीवर सर्वांच्या नजरा

अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही वैमानिकांची नावे अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य वैमानिकाला विमान उडवण्याचा ३,००० तासांहून अधिकचा दांडगा अनुभव होता. हे मुख्य वैमानिक गुजरातचे रहिवासी होते, तर सह-वैमानिक केरळ येथील रहिवासी होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button