ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज; ‘सेहवाग-द्रविड’ जोडीवर सर्वांच्या नजरा

India U19 Squad Announcement | भारतीय क्रिकेटमध्ये एका नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी बीसीसीआयने भारताच्या १९ वर्षांखालील (अंडर-१९) संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाचा अंडर-१९ संघ तीन एकदिवसीय आणि दोन बहु-दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय युवा संघ १८ ते २३ सप्टेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची अनधिकृत एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा यापूर्वीच झाली होती, तर आता भारतीय संघही जाहीर करण्यात आला आहे. या निवडीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनेक वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा ‘सेहवाग-द्रविड’ ही ऐतिहासिक जोडी पाहायला मिळू शकते.
भारतीय संघात दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचा मुलगा ‘आर्यवीर सेहवाग’ आणि राहुल द्रविडचा मुलगा ‘अन्वय द्रविड’ या दोघांचीही निवड करण्यात आली आहे. या मालिकेसाठी लक्ष्य रायचंदानी याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून यशवर्धन चौहान उपकर्णधार असणार आहे.
हेही वाचा
PCMC: निगडी प्राधिकरणात चेंबरमध्ये अडकून दोन कामगारांचा मृत्यू
🚨 News 🚨
India U19 squad for Australia U19 Men’s Tour of India announced.
The tour consists of three One-Day matches and two Multi-Day fixtures.
Venues 🏟️: Rajkot and Ahmedabad
More Details ▶️ https://t.co/o2pF8bj3RJ
#INDU19vAUSU19 pic.twitter.com/Ud0tvcqaBe
— BCCI (@BCCI) August 27, 2026
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा अंडर-१९ संघ:
लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल, आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनल चौहान, अन्वय द्रविड, व्ही. यशवीर, रोहित यादव, शविन विनोद, मोहित उल्वा, चिगुरुपती व्यंकटा आणि काव्य पटेल.
ऑस्ट्रेलियाचा अंडर-१९ संघ:
केसी बार्टन, हेडन बारबुलोविक, एली ब्रेन, विल बायरोम, ब्लेक कॅटेल, जॅक जोसनेक, स्पेन्सर ग्रीन, कॉनर ग्रेगरी, चार्ली हेंडरसन, जेड हॉलिक, मॅथ्यू लफ, नील पटेल, जेकब पीट्झ, पॅट्रिक सुलिव्हन, थियो सिंगोस, थॉमस व्हॅसिओ.
भारत अंडर-१९ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-१९ वनडे मालिकेचे वेळापत्रक:
- पहिला एकदिवसीय सामना: १८ सप्टेंबर २०२६ (सकाळी ९:३० वाजता)
- दुसरा एकदिवसीय सामना: २१ सप्टेंबर २०२६ (सकाळी ९:३० वाजता)
- तिसरा एकदिवसीय सामना: २३ सप्टेंबर २०२६ (सकाळी ९:३० वाजता)





