TOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी

Meta New Rule : १८ वर्षांखालील मुलांसाठी फेसबुक-इन्स्टाग्रामवर नवे निर्बंध

अमेरिकेत किशोरवयीनांच्या सुरक्षेसाठी मेटाचा मोठा निर्णय; रात्री १२ ते सकाळी ६ सोशल मीडिया वापरावर बंदी, दिवसाला केवळ दोन तासांची मर्यादा

वॉशिंग्टन : अमेरिकेत किशोरवयीन मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेशी संबंधित मोठ्या प्रकरणानंतर मेटा कंपनीने तडजोड स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मेटा सुमारे १७ अब्ज डॉलरची भरपाई देणार असून, मुलांच्या सुरक्षिततेसाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या वापरासंदर्भात महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत.

नव्या नियमांनुसार अमेरिकेत १८ वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी सोशल मीडिया वापरावर कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. किशोरवयीन मुलांचे मानसिक आरोग्य, ऑनलाइन सुरक्षितता आणि वाढता स्क्रीन टाइम लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा –  पिंपळवंडीतील चिमुकलीच्या कुटुंबाला शासनाचा आधार; १० लाखांची मदत, घरकुलाचीही घोषणा

नव्या नियमांनुसार १८ वर्षांखालील मुलांना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरता येणार नाही. तसेच दिवसातील सोशल मीडिया वापरासाठी दोन तासांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

शालेय दिवसांमध्येही सोशल मीडिया वापरावर निर्बंध असतील. या निर्णयामुळे मुलांचा वाढता स्क्रीन टाइम कमी होण्यास मदत होईल, तसेच रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया वापरण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button