Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

गडकिल्ले, मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला वेग; ३ टक्के निधीला २०२६-२७ पर्यंत मुदतवाढ

राज्यातील १८४ स्मारकांच्या संवर्धनासाठी ४४१ कोटींच्या कामांना तांत्रिक मान्यता; नांदोस गढीत पुरातत्व स्थळ संग्रहालय, सिद्धगड राज्य संरक्षित स्मारक होणार

मुंबई : महाराष्ट्रातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून (सर्वसाधारण) उपलब्ध होणाऱ्या ३ टक्के निधीच्या तरतुदीला २०२६-२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निधीसह विभागीय निधीतून सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामांना गती देण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे मंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदोस गढी, भगवंतगड आणि सिद्धगडाच्या संवर्धनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

नांदोस गढी येथे ‘पुरातत्व स्थळ संग्रहालय’ उभारण्यात येणार असून, त्याचे व्यवस्थापन स्थानिक ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात येणार आहे. भगवंतगडाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल सर्व्हे करून त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.

सिद्धगडाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गड परिसरात कोणत्याही प्रकारचे बेकायदा उत्खनन अथवा खनन होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आल्याची माहिती मंत्री शेलार यांनी दिली.

हेही वाचा –  रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय; राज्यभर फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिटचे आदेश

पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या जिल्हा वार्षिक योजनेतून राज्यातील १८४ स्मारकांच्या संवर्धनासाठी ४४१.१४ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १६१ कामांना ३७२.३४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

यातील १०५.६१ कोटी रुपयांची ५२ कामे पूर्ण झाली असून, १८४.६८ कोटी रुपयांची १०८ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. तसेच विभागीय निधीतून १०८ कामांना ६२७.६२ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे. यापैकी १६ कामे पूर्ण झाली असून ८६ कामे सुरू आहेत.

ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच गड-किल्ल्यांच्या संवर्धनातून पर्यटनाला चालना देण्यावरही भर देण्यात येत आहे. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पुरातत्व संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button