Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

मैदानातील राडा भोवला; यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोला ICCचा दणका!

Yashasvi Jaiswal Asitha Fernando | भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मैदानावर एकमेकांशी भिडणे भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो यांना महागात पडले आहे. आयसीसीने (ICC) दोघांवरही आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करत सामना शुल्काच्या (मॅच फी) २५ टक्के दंड आणि प्रत्येकी एक ‘डिमेरिट पॉइंट’ ठोठावला आहे.

पहिल्या डावातील १७ व्या षटकात फर्नांडोने जैस्वालला ४५ धावांवर बोल्ड केले. बाद झाल्यानंतर माघारी परतणाऱ्या जैस्वालला फर्नांडोने काहीतरी बोलल्याने वाद पेटला. बाचाबाची इतकी वाढली की, जैस्वालने फर्नांडोवर हेल्मेट उगारले, तर फर्नांडोने त्याला धक्का दिला. अखेर पंच आणि इतर खेळाडूंनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले.

हेही वाचा

लिफ्टच्या बहाण्याने कारमध्ये बसला; अंगठी लंपास करून साधू पसार!

आयसीसीच्या ‘कलम २.१२’ (अयोग्य शारीरिक संपर्क) अंतर्गत दोघांवर कारवाई करण्यात आली. दोघांनीही आपली चूक मान्य केल्याने पुढील सुनावणी टळली. गेल्या २४ महिन्यांत दोघांचाही हा पहिलाच गुन्हा असल्याने त्यांच्यावर सामन्यांची बंदी न घालता केवळ दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button