TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा २ हजार रुपये पॉकेटमनी? सरकारचा प्रस्ताव विचाराधीन

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना आर्थिक आधार देण्यासाठी दरमहा २ हजार रुपये पॉकेटमनी देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या धर्तीवर हा उपक्रम राबवण्याचा विचार उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थिनींना उच्च शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये आणि शिक्षण घेत असताना त्यांच्या वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो.

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना ‘कमवा आणि शिका’ योजनेच्या धर्तीवर दरमहा २ हजार रुपये पॉकेटमनी देण्याबाबत विभागात विचार सुरू आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. मात्र, हा प्रस्ताव अद्याप चर्चेच्या टप्प्यात असून त्याला अंतिम मंजुरी मिळालेली नाही.

हेही वाचा –  ‘‘वंदे मातरम्‌’’ च्या सन्मानासाठी पिंपरी-चिंचवड भाजपाची एकजूट; महापालिका सभा तहकूब

हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्यातील विद्यापीठे आणि मोठ्या महाविद्यालयांशी चर्चा करण्याचे नियोजन आहे. तसेच कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून विद्यार्थिनींना दरमहा २ हजार रुपयांची आर्थिक मदत देता येईल का, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे.

२० ऑगस्ट रोजी मुंबईतील काही महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांशी मंत्रालयात संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक मदतीच्या या प्रस्तावाबाबत विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या जवळपास १२ लाख विद्यार्थिनींना या प्रस्तावित योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे. योजना मंजूर होऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यास मुलींच्या उच्च शिक्षणाला आर्थिक बळ मिळण्यासोबतच उच्च शिक्षणातील त्यांचा सहभाग वाढण्यास मदत होऊ शकते.

दरम्यान, दरमहा २ हजार रुपये पॉकेटमनी देण्याचा प्रस्ताव अद्याप अंतिम झालेला नाही. त्यामुळे पात्रता, अर्ज प्रक्रिया, निधीचे स्वरूप आणि योजनेच्या अंमलबजावणीची तारीख याबाबत अधिकृत निर्णय झाल्यानंतरच स्पष्टता येणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button