कोलकाता येथील हॉटेलला मध्यरात्री भीषण आग; ९ जणांचा होरपळून मृत्यू, २८ जणांना वाचवण्यात यश

Kolkata Fire | कोलकाता येथील मध्यवर्ती भागातील ‘फ्री स्कूल स्ट्रीट’ (मिर्झा गालिब स्ट्रीट लगत) परिसरातील एका हॉटेलला मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत नऊ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केल्यामुळे हॉटेलमधील नागरिकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत खिडक्या तोडून शिडीच्या साहाय्याने २८ जणांना सुखरूप बाहेर काढले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये अचानक आग भडकली. रात्रीची वेळ असल्याने हॉटेलमधील बहुतेक खोल्यांमध्ये नागरिक गाढ झोपेत होते. आग आणि धूर वेगाने पसरल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने अग्निशमन दलाचे मुख्यालय जवळच असल्याने दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी खिडक्या तोडून शिड्यांच्या मदतीने आत प्रवेश केला आणि अडकलेल्या २८ जणांची सुरक्षित सुटका केली.
हेही वाचा
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर: १७ खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’, क्रिकेटपटूंना डच्चू!
VIDEO | West Bengal: At least nine killed, six injured in massive fire at a hotel in Kolkata; visuals from the spot, further details awaited.
(Full video available on PTI Videos – https://t.co/d8jp61yd2p)#Kolkata #Fire pic.twitter.com/7IQLA1pdI4
— Press Trust of India (@PTI_News) August 19, 2026
मृतांमध्ये बांगलादेशी नागरिकांसह एका बालकाचा समावेश
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांमध्ये बांगलादेश, मेघालय आणि पश्चिम बंगालमधील अलीपूर येथील नागरिकांचा समावेश आहे. मृतांमध्ये पुरुष, महिला आणि एका लहान मुलाचा समावेश असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. वाचवण्यात आलेल्या २८ जणांना कोलकाता येथील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या भागात बांगलादेशातून येणाऱ्या प्रवाशांचा राबता अधिक असतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.





