Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

PMRDA हद्दीतील रस्ते व विकासकामांना गती देण्याचे निर्देश

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा पीएमआरडीए मुख्यालयात आढावा

प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार

पुणे | शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत येणाऱ्या भागातील रस्ते आणि विविध विकासकामांना गती देण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयाला भेट देत कामांचा सविस्तर आढावा घेतला.

महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्राधिकरणाच्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी मतदारसंघातील पीएमआरडीए हद्दीतील रस्त्यांची सद्य:स्थिती, सुरू असलेली कामे, प्रस्तावित प्रकल्प तसेच उपलब्ध निधी याबाबत मुद्देसूद चर्चा करण्यात आली.

हेही वाचा

नीट आंदोलनावरील पोलीस कारवाईची उच्चस्तरीय चौकशी होणार; सर्वोच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय समिती

नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्यास प्राधान्य द्यावे, अशी स्पष्ट सूचना खासदार डॉ. कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना केली. केवळ प्रस्ताव आणि कागदोपत्री प्रक्रिया न राहता प्रत्यक्ष कामांना गती मिळणे आणि त्याचा थेट फायदा नागरिकांना होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पीएमआरडीएकडून या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, बैठकीत निश्चित झालेल्या कामांचा नियमितपणे आढावा घेणार असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. मतदारसंघातील प्रत्येक प्रलंबित विकासकाम मार्गी लागेपर्यंत संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देत रस्ते, पायाभूत सुविधा आणि प्रस्तावित विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

“शिरूर लोकसभा मतदारसंघातील पीएमआरडीए हद्दीत येणाऱ्या भागातील रस्ते आणि विविध विकासकामांना गती मिळणे आवश्यक आहे. नागरिकांना रोज भेडसावणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. सुरू असलेली कामे, प्रस्तावित प्रकल्प आणि निधीच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा घेतला आहे. पीएमआरडीएकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, निश्चित झालेल्या कामांचा नियमित आढावा घेत राहणार आहे. मतदारसंघातील प्रत्येक प्रलंबित प्रश्न मार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील.”

– डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघ

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button