Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्काराने क्रीडाक्षेत्राचा गौरव

दिव्या देशमुख, विदित गुजराथी यांना अर्जुन; नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार

मुंबई | भारतीय क्रीडाक्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणारे अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाल्याने महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. महाराष्ट्रातील युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुख व विदित गुजराथी यांना अर्जुन पुरस्कार, तर महाराष्ट्राच्या सुकन्या नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे यांना राष्ट्रीय खेळ प्रतिष्ठान पुरस्कार जाहीर झाल्याने राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे.

असामान्य प्रतिभा, सातत्यपूर्ण मेहनत आणि उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर या खेळाडू व प्रशिक्षकांनी राष्ट्रीय पातळीवर आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्रातील युवा व नवोदित खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळणार असून, क्रीडा क्षेत्रात नव्या उमेदीने पुढे जाण्याचा आत्मविश्वासही निर्माण होणार आहे.

हेही वाचा

PMRDA हद्दीतील रस्ते व विकासकामांना गती देण्याचे निर्देश

देशभरातील यंदाच्या अर्जुन पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये तेजस्विन शंकर व मुहम्मद अजमल व्ही. (ॲथलेटिक्स), सुरजीत व पूजा (कबड्डी), प्रियंका गोस्वामी (ॲथलेटिक्स), तृषा जॉली व पुलेला गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन), रुद्रांश खंडेलवाल व एकता भ्यान (पॅरा क्रीडा), नरेंदर (बॉक्सिंग), अरविंद सिंह (रोइंग), धनुष श्रीकांत (डेफ शूटिंग), अखिल श्योराण (शूटिंग), लालरेंसियामी व राजकुमार पाल (हॉकी) यांचा समावेश आहे.

या पुरस्कारांमुळे देशभरातील २३ खेळाडू व प्रशिक्षकांच्या उल्लेखनीय क्रीडा प्रवासाला राष्ट्रीय पातळीवर गौरवाची पावती मिळाली आहे. त्यांच्या यशातून प्रेरणा घेत देशातील अनेक युवा खेळाडू आपापल्या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त खेळाडू व प्रशिक्षकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button