Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ६० हजार कोटींचे रस्ते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा!

पुणे | पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी येत्या दोन वर्षांत तब्बल ६० हजार कोटी रुपयांच्या विविध रस्त्यांची कामे केली जातील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली. सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठाच्या वतीने आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून विशेष ‘इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग मॉडेल’ तयार करण्यात आले असून, यामुळे खर्चात मोठी बचत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बाह्यवळण मार्गांमुळे शहरावरील ताण कमी होणार:

सूरत-दक्षिण भारत कॉरिडॉर: सूरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर मार्गे जाणाऱ्या नव्या कॉरिडॉरमुळे उत्तर भारत व गुजरातमधून दक्षिण भारतात जाणारी वाहने पुण्यात न येता परस्पर वळवली जातील. यामुळे दिल्ली ते चेन्नई अंतर ३२० किमीने कमी होईल.

नवीन लिंक रोड: ठाणे आणि शिळफाटा भागातील जड वाहतूक शहरात न येता थेट अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगरकडे वळवण्यासाठी नवीन लिंक रोडचे नियोजन आहे.

हेही वाचा

हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध; राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई-पुणे-बंगळुरू प्रवास गतिमान: नवीन द्रुतगती मार्गाच्या पागोटे चौकापर्यंतच्या कामाची निविदा पूर्ण झाली असून, यामुळे मुंबई ते बंगळुरू प्रवास केवळ पाच तासांत करणे शक्य होणार आहे.

६० हजार कोटींचे प्रमुख प्रकल्प:

  • शिरूर ते छत्रपती संभाजीनगर: १५,००० कोटी रुपये (१९२ किमी)
  • खेड ते नाशिक फाटा एलिव्हेटेड मार्ग: ८,००० कोटी रुपये (३० किमी – निविदा प्रक्रिया पूर्ण)
  • पुणे-शिरूर उन्नत मार्ग: ७,५१५ कोटी रुपये (५३.४० किमी)
  • रावेत ते नऱ्हे उन्नत कॉरिडॉर: ६,००० कोटी रुपये (३२ किमी)
  • हडपसर ते यवत उन्नत मार्ग: ५,२६५ कोटी रुपये (३१.६५ किमी)
  • तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्ग: ४,००० कोटी रुपये (५४.२० किमी – काम सुरू)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button