Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भाजपाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर! स्मृती इराणी, राम माधव यांचे पुनरागमन

नवी दिल्ली | आगामी राजकीय घडामोडी आणि संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या केंद्रीय संघटनरचनेत मोठे फेरबदल केले आहेत. जाहीर करण्यात आलेल्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि राम माधव यांचे पक्षाच्या मुख्य नेतृत्वात पुनरागमन झाले आहे. तर दुसरीकडे, पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांना पदावरून हटवण्यात आले आहे.

सोमवारी जाहीर झालेल्या नव्या अधिसूचनेनुसार स्मृती इराणी यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची (National General Secretary) महत्त्वपूर्ण धुरा सोपवण्यात आली आहे.

प्रमुख नियुक्त्या आणि महत्त्वाचे बदल:

स्मृती इराणी व राम माधव यांचे पुनरागमन: लोकसभा निवडणुकीनंतरच्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर स्मृती इराणी यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपद, तर राम माधव यांच्याकडे राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पियूष गोयल नवे कोषाध्यक्ष: केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी (National Treasurer) नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा

आरक्षण संपविण्याची भाषा संविधानाचा अपमान; अशांवर कठोर कारवाई करा : रामदास आठवले

विनोद तावडे यांचे पद कायम: राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे यांनी आपले स्थान कायम राखले आहे.

दीपक म्हस्के नवे आयटी सेल प्रमुख: पक्षाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांची गच्छंती झाली असून, छत्तीसगडचे दीपक म्हस्के आता भाजपच्या राष्ट्रीय आयटी सेलची जबाबदारी सांभाळणार आहेत.

माध्यम विभाग: पक्षाच्या प्रसारमाध्यम विभागाची (Media In-Charge) धुरा खासदार अनिल बलूनी यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे.

महिला नेत्यांना प्राधान्य: जाहीर करण्यात आलेल्या १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांच्या यादीत ६ महिला नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि रेखा वर्मा यांचा समावेश आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button