स्वातंत्र्यदिनानिमित्त निखिल बोऱ्हाडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाला मानवंदना

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. क प्रभाग (विजयदुर्ग) क्षेत्रीय कार्यालय, भोसरी येथे आयोजित ध्वजारोहण समारंभास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक तथा ‘क’ प्रभाग (विजयदुर्ग) क्षेत्रीय कार्यालयाचे सभापती निखिल बोऱ्हाडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रगीत व राष्ट्रीय गीताच्या सन्मानपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर MSF जवानांनी शिस्तबद्ध संचलन करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. उपस्थित अधिकारी, कर्मचारी, मान्यवर आणि नागरिकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हेही वाचा – ‘प्रमाणपत्र मिळेपर्यंत अंतरवली सोडायची नाही’; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

यावेळी नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी उपस्थितांशी संवाद साधत स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व अधोरेखित केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे जतन करत राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाने आपले योगदान देण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, MSF जवान तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधत सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत “स्वातंत्र्याची मूल्ये जपूया आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने योगदान देऊया,” असा निर्धार यावेळी करण्यात आला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“स्वातंत्र्य आपल्याला मोठ्या संघर्षातून मिळाले आहे. या स्वातंत्र्याची मूल्ये जपत देशाच्या विकासात प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. एकजूट, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेच्या भावनेतून विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देऊया,”
– निखिल बोऱ्हाडे, सभापती, ‘क’ प्रभाग (विजयदुर्ग) क्षेत्रीय कार्यालय





