ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडपुणे

शिक्षण स्वतःला सक्षम करण्याचे माध्यम; बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे

मीडियाचा वापर व्यक्तिमत्त्व विकासासाठी करा - अंकिता पाटील ठाकरे

पीसीयू मध्ये ‘दीक्षारंभ २०२६-२७’ सोहळा संपन्न

पिंपरी, पुणे |  शिक्षण हे स्वतःला सक्षम करण्याचे आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याचे माध्यम आहे. तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वापर मनोरंजन शिवाय ज्ञान, कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी करावा. तसेच व्यावसायिक जीवनात पदार्पण केल्यानंतर समाजासाठी योगदान देण्याची भावना जोपासावी असे मार्गदर्शन पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष आणि इंडियन शुगर मिल्स असोसिएशन सदस्य अंकिता पाटील ठाकरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये स्कूल ऑफ फार्मसी, स्कूल ऑफ सायन्सेस, पुणे डिझाईन स्कूल आणि पुणे स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा ‘दीक्षारंभ २०२६-२७’ या स्वागत सोहळा ठाकरे बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रझा मुराद, स्वतंत्र सार्वजनिक आरोग्य सल्लागार डॉ. शंकर दापेकर, पीसीइटी चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयू चे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, पीसीयूचे संचालक, प्रशिक्षण व प्लेसमेंट डॉ. शितलकुमार रवंदळे, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. यावेळी ‘स्टुडंट मॅन्युअल’ चे अनावरण करण्यात आले.

प्रसिद्ध अभिनेते रझा मुराद यांनी सांगितले की, प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने मेहनत घेतली व कामात सातत्य ठेवले तर प्रत्येकाला योग्य संधी नक्की मिळते.

हेही वाचा

‘मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डॉ. शंकर दापेकर यांनी सांगितले की, आरोग्यदायी जीवनशैली साठी नियमित व्यायाम, पुरेशी झोप, योग्य आहार या त्रिसूत्राचें पालन करावे.

डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, पीसीयू मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, उद्योगाभिमुख शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असतात. त्याचा उपयोग शैक्षणिक, कौशल्य विकासा बरोबर करिअर साठी करावा. पीसीयू च्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून अनेक करिअर संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते.

डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय सहकार्य, कोरियन उद्योगांशी संपर्क, विविध परदेशी भाषा शिकण्याच्या संधी, सेंटर ऑफ एक्सलन्स, एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा.

स्वागत डॉ. गिरीश देसाई, सूत्र संचालन अभिषेक चौधरी आणि आभार ऋचू कुटियाला यांनी मानले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीयू नियामक मंडळ सदस्य उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button