ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका सभागृहात लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे तैलचित्र लावण्याची मागणी

नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या पाठपुराव्याला आयुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक वाटचालीत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणारे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे तैलचित्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहात सन्मानपूर्वक लावण्यात यावे, अशी महत्वपूर्ण मागणी भाजपा नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली असून, आयुक्तांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय दिवंगत नेत्यांची तैलचित्रे सन्मानपूर्वक लावण्यात आलेली आहेत. या परंपरेत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचेही तैलचित्र लावण्यात यावे, अशी भूमिका नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी मांडली आहे.

स्व. गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील जनसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जातात. ग्रामीण, शेतकरी, कष्टकरी, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना त्यांनी सातत्याने वाचा फोडली. संघर्षातून उभे राहून त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी, जनसेवा आणि विकासाभिमुख राजकारणाचा आदर्श निर्माण झाला.

हेही वाचा –  डिजिटल युगात वाचनाची सवय वाढवण्याचे आवाहन एम.आय.टी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथपाल दिनानिमित्त विशेष व्याख्यान संपन्न

विशेष म्हणजे, योगिता नागरगोजे यांनी केवळ मागणी करून न थांबता यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या मागणीची दखल घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सकारात्मक भूमिका घेत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याने या मागणीला आता प्रशासकीय पातळीवरही गती मिळणार आहे.

त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात लवकरच लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे तैलचित्र सन्मानपूर्वक विराजमान होणार असून, नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या या मागणीचे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मुंडे साहेबांच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या नागरिकांकडून स्वागत होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पिंपरी-चिंचवडसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या शहराच्या महापालिका सभागृहात स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांसारख्या लोकनेत्याचे तैलचित्र म्हणजे त्यांच्या विचारांचा आणि जनसेवेच्या कार्याचा गौरवच ठरेल, त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या संघर्षमय सामाजिक व राजकीय प्रवासाची आठवण कायम राहावी या उद्देशाने आमचे नेते आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हि मागणी केली असून आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

– योगिता नागरगोजे, नगरसेविका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button