TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

बिग बॉस फेम लोपामुद्रा राउतच्या घरात 76 लाखांची चोरी; फरार चोरट्याला बिहारमधून अटक

Lopamudra Raut theft case : बिग बॉस फेम अभिनेत्री लोपामुद्रा राउतच्या घरात तब्बल 76.39 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने असा लाखोंचा ऐवज घेऊन आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा बिहारपर्यंत माग काढला आणि त्याला अटक केली. आरोपीकडून चोरीतील लाखोंचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे.

 

‘बिग बॉस’मुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि मॉडेल लोपामुद्रा राउत सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लोपामुद्राच्या मुंबईतील घरातून तब्बल 76.39 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या प्रकरणातील चोरी करून फरार झालेल्या आरोपीला मुंबई पोलिसांनी बिहारमधील दरभंगा येथून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या मुद्देमालापैकी 51 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मुंबईतील सांताक्रूझ परिसरात लोपामुद्राचे घर आहे. काही कामानिमित्त ती घराबाहेर असताना जुलै महिन्यात तिच्या घरात चोरी झाल्याचे समोर आले होते. घरातून महागडे सामान, रोख रक्कम आणि सोन्याचे बिस्किटे चोरीला गेले होते. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये महागड्या घड्याळासह सोन्याचे दोन बिस्किटे, रोख पैसे आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा –  ‘महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचे अण्णासाहेब डांगे यांना श्रेय’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोबाईल फोनचे तपशील आणि लोकेशन-आधारित माहितीसह तांत्रिक माहितीचा वापर करून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. तपासादरम्यान दरभंगाचा धागा मिळाल्यावर, मुंबई पोलिसांचे एक पथक तिथे गेले आणि दरभंगा पोलिसांच्या मदतीने त्यांनी सोनकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी छापा टाकला.

पोलिसांनी सांगितले की, चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू अद्याप हस्तगत करायच्या बाकी आहेत. या चोरी प्रकरणात आणखी कोण सामील होते का, याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांना संशय आहे की, त्याने चोरीच्या पैशांपैकी काही रक्कम वापरून आपल्या बहिणीच्या नावे दोन गुंठे जमीन खरेदी केली होती.

मीडिया रिपोर्टनुसार, हा चोर बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील एका गावातील २६ वर्षीय तरुण आहे. चंदन मुखिया असे त्याचे नाव आहे. त्याने बांबूच्या काठीचा वापर करून पाचव्या मजल्यावरील बाल्कनीत प्रवेश केला आणि त्यानंतर दरवाजा तोडून लोपामुद्राच्या बेडरूममध्ये घुसून मौल्यवान वस्तूंची चोरी केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button