Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुढील दोन दिवस राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण, हवामान विभागाचा मोठा इशारा

weather forecast : राज्यात जून महिन्यामध्ये मान्सूनचं आगमन झालं होतं. मात्र जून महिना जवळपास कोरडाच गेला, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने महाराष्ट्रात जोर पकडला, जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील राज्यात चांगला पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि पेरण्यांना वेग आला, दरम्यान त्यानंतर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली, वीस जुलैपर्यंत राज्यात पाऊसच न झाल्याने पीकं चांगलीच संकटात आली होती. मात्र पुन्हा एकदा वीस जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढल्याने पिकांना जीवदान मिळालं. एक ऑगस्टपर्यंत राज्यात जोरदार पाऊस सुरू होता, परंतु आता पावसाचं प्रमाण कमी होणार आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

कोकणात पावसाचा जोर ओसरला आहे. आज कोकणाला पावसाचा यलो अर्लट देण्यात आला आहे.   बंगालच्या उपसागरात येत्या २४ तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे, त्याचा प्रभाव अरबी समुद्रावर पडणार आहे. तसेच राज्याच्या पुर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे देखील पावसाचा जोर कमी होणार आहे. कोकणामध्ये पुढील काही दिवस मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.  पुढील दोन ते तीन दिवस पावसासाठी अनुकून वातावरण असल्याचंही हवामान विभागाने म्हटलं आहे. राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कमी राहिला आहे.

हेही वाचा –  दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत ‘परत ४१° च्या मागावर’चे विशेष प्रदर्शन

दरम्यान यंदा पावसावर अन् निनोचं संकट आहे, असा इशारा या वर्षाच्या सुरुवातीलाच हवामान विभागाकडून देण्यात आला होता. याचा परिणाम आता जाणवू लागला आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज या महिन्याच्या सुरुवातीलाच हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अजूनही मराठवाड्यात सरसरी पावसाची तूट भरून निघालेली नाहीये, मात्र राज्यातील काही भागांमध्ये मागील काळात मुसळधार पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button