Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत ‘परत ४१° च्या मागावर’चे विशेष प्रदर्शन

नवी दिल्ली : मराठी चित्रपटांचा समृद्ध वारसा, आशयघन कथानक, प्रयोगशीलता आणि दर्जेदार कलाकृती देशाच्या राजधानीतील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळा’च्या दिल्ली आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमंतर्गत आज ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गौरविण्यात आलेल्या ‘परत ४१°च्या मागावर’ (On the Trail of 41°) या लघुपटाच्या विशेष प्रदर्शनाने झाली.

या प्रसंगी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त श्वेता सिंगल, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर आणि दिल्ली परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्र जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, दादासाहेब फाळके चित्रनगरी जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण, महाराष्ट्र सदन व्यवस्थापक प्रमोद कोलापते आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या पुढाकाराने मुंबईत सुरू असलेल्या या उपक्रमाचा विस्तार आता महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या पुढाकाराने नवी दिल्ली येथे करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत नवीन महाराष्ट्र सदन येथे दर महिन्याला निवडक आणि दर्जेदार मराठी चित्रपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

हेही वाचा –  ‘अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्राला ‘अंब्रेला’ संस्थेमुळे नवसंजीवनी’; केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

सन 2023मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे निर्मित ‘परत ४१°च्या मागावर’ हा २३ मिनिटांचा लघुपट असून त्याचे दिग्दर्शन अधीप दास यांनी केले आहे. लेखन अधीप दास आणि प्रसाद वेदविख्यात यांनी केले असून छायाचित्रण प्रसाद वेदविख्यात, संकलन अरविंद जयन, तर ध्वनीरचना व ध्वनीमिश्रण शिवपाल सिंह कांग यांनी केले आहे.परत ४१°च्या मागावर’ या लघुपटाला ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे.

कोकणातील समुद्रकिनारी गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित या लघुपटाची कथा मेहमूदा या जिज्ञासू तरुणीभोवती फिरते. ‘४१’ या गूढ संदेशाचा शोध घेताना तिच्यासमोर उलगडत जाणारे रहस्य आणि त्यामागील सत्य जाणून घेण्याची तिची धडपड चित्रपटाला उत्कंठावर्धक व वेगळे परिमाण देते. वीस वर्षांनंतर पुन्हा एका रहस्यमय घटनेशी तिचा संबंध येतो आणि तीन जिज्ञासू मुलांच्या मदतीने ती या गूढाचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. विज्ञान, कल्पनाशक्ती, रहस्य आणि मानवी जिज्ञासा यांचा सुरेख संगम या लघुपटातून अनुभवायला मिळतो.

लघुपटाच्या प्रदर्शनानंतर त्याच्या आशयावर सविस्तर चर्चा  करण्यात आली. यावेळी संकल्पना, कथानक, दिग्दर्शन, ध्वनीरचना, कोकणाची पार्श्वभूमी, निर्मिती प्रक्रिया तसेच चित्रपटातील विविध कलात्मक पैलूंवर उपस्थित मान्यवर आणि चित्रपट रसिकांनी विचारविनिमय केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button