Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं

Sri Lanka vs India Warm-up Match : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडिया सध्या श्रीलंका इलेव्हनविरुद्ध वॉर्म-अप सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खुपच खराब झाली, दुसऱ्याच दिवशीच्या दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर नंबर-3 वर देवदत्त पडिक्कल मैदानात आला. त्याने दमदार अर्धशतक झळकावत आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. पडिक्कलच्या या खेळीमुळे पहिल्या कसोटीतील प्लेइंग-11 मध्ये साई सुदर्शनच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात 15 ते 27 ऑगस्टदरम्यान दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेसाठी साई सुदर्शनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, अलीकडेच त्याला घोट्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो बंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये रिहॅब करत होता. परिणामी, 4 ऑगस्टला श्रीलंकेला रवाना झालेल्या भारतीय संघासोबत तो जाऊ शकला नाही. सुदर्शन आता 8 ऑगस्टला श्रीलंकेत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत टीम इंडियातील त्याच्या स्थानासाठी स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. कारण श्रीलंका इलेव्हनविरुद्धच्या वॉर्म-अप सामन्यात नंबर-3 वर फलंदाजीला आलेल्या देवदत्त पडिक्कलने शानदार अर्धशतक झळकावलं आहे.

हेही वाचा –  दैनंदिन आहारात ‘फायबर’ वाढवण्यासाठी ‘फायबरमॅक्सिंग’चा फंडा; तरुणाईमध्ये वाढतेय क्रेझ

पडिक्कलने सुरुवातीला परिस्थितीचा अंदाज घेत फलंदाजी केली आणि त्यानंतर डावाला वेग दिला. त्याने 61 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या खेळीत त्याने सहा चौकार लगावले. अर्धशतकानंतरही पडिक्कलने आपली फलंदाजी सुरू ठेवली आणि तो नाबाद राहिला. या खेळीमुळे पडिक्कलने श्रीलंकेच्या परिस्थितीत फलंदाजी करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत नंबर-3 साठी त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. देवदत्त पडिक्कलने अनुभवी फलंदाज केएल राहुलसोबत महत्त्वाची भागीदारी रचली. दोघांनी मिळून 138 चेंडूंमध्ये 96 धावांची भागीदारी केली.

श्रीलंका इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर 90 षटकांत 8 विकेट गमावत 363 धावा केल्या. श्रीलंका इलेव्हनकडून निशान मदुशंकाने 65 चेंडूंमध्ये 66 धावांची खेळी केली. रविंद्र रासांथाने 143 चेंडूंमध्ये 71 धावा केल्या, तर कर्णधार सोनल दिनूषाने 52 धावा केल्या. पसिंदू सूर्यबांदारा यानेही 63 चेंडूंमध्ये 35 धावांचं योगदान दिलं. श्रीलंका इलेव्हनच्या डावात अजून दोन विकेट शिल्लक असताना घोषित केला. मात्र, भारताची सुरुवात धक्कादायक झाली. दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर यशस्वी जायस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर पडिक्कलने डाव सावरला आणि केएल राहुलसोबत महत्त्वाची भागीदारी केली. भारताने 27 षटकांमध्ये 2 विकेट गमावत 104 धावा केल्या असून देवदत्त पडिक्कल नाबाद खेळत आहे. रविंद्र जडेजाही त्याच्यासोबत फलंदाजी करत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button