ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सुनेत्राताई पवार यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

“बालबुद्धीच्या काँग्रेसी नेत्यांनी सुनेत्रावहिनींच्या पाया पडून माफी मागावी” – माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांनी आक्रमक भूमिका घेत काँग्रेसच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दांत समाचार घेतला.

यावेळी डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या की, राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे. एखाद्या नेत्याच्या राजकीय भूमिकेवर, निर्णयांवर अथवा कार्यपद्धतीवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र, टीका करताना वैयक्तिक पातळीवर जाऊन एखाद्या महिला राजकीय व्यक्तिमत्त्वाचा अवमान करणे ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारी बाब नाही.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राला मोठी राजकीय आणि सामाजिक परंपरा लाभली आहे. या राज्यात महिलांचा सन्मान करण्याची संस्कृती आहे. राजकीय संघर्ष कितीही टोकाचा असला तरी विरोधकांविषयी सभ्यता आणि सन्मान राखला जातो. मात्र, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडूनच महिलांविषयी अशा प्रकारची भाषा वापरली जात असेल, तर हा प्रकार गंभीर व निंदाजनक आहे.

हेही वाचा

तरुण तेजपाल बलात्काराच्या प्रकरणात दोषी, दुपारी शिक्षेची घोषणा

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला.

सुनेत्राताई पवार यांच्याविषयी करण्यात आलेले वक्तव्य तातडीने मागे घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली. तसेच भविष्यात राजकीय टीका करताना महिलांचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा व सभ्यतेचा सन्मान राखावा, असे आवाहनही करण्यात आले.

या आंदोलनामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यावरील वक्तव्याचा मुद्दा पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चांगलाच तापला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात या प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

“काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्याबाबत अवमानकारक भाषा वापरणे अत्यंत दुर्दैवी व निषेधार्य आहे. सुनेत्रावहिनींचा अपमान करणारे हे वक्तव्य केवळ त्यांचाचं नाही, दिवंगत लोकनेते स्व. अजितदादा पवार यांचाही अपमान आहे. तसेच सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या प्रत्येक महिलेचा अवमान करणारे हे कृत्य आहे. त्यामुळे बालबुद्धीच्या काँग्रेसी नेत्यांनी सुनेत्रावहिनींच्या पाया पडून त्यांची माफी मागावी.”

– डॉ. वैशाली घोडेकर, माजी महापौर, नगरसेविका, पिं. चिं. मनपा

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button