Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवादी हल्ला! छत्तीसगडच्या दोन निष्पाप मजुरांचा बळी

Kulgam Terror Attack | दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या छत्तीसगडच्या दुसऱ्या विटभट्टी कामगाराचा आज, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रीनगर येथील रुग्णालयात त्याने अंतिम श्वास घेतला. या घटनेमुळे या अतिरेकी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप मजुरांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत दोन्ही मृतक कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

जुलै महिन्यातील हा दुसरा मोठा अतिरेकी हल्ला असून ऑक्टोबर २०२४ नंतर काश्मीरमध्ये स्थलांतरित मजुरांवर झालेला हा पहिलाच हल्ला आहे. यापूर्वी २२ जुलै रोजी अनंतनाग शहरात अतिरेक्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ‘विशेष कृती गटात’ (STG) तैनात असलेल्या एका पोलिसाची जवळून गोळ्या झाडून हत्या केली होती. गेल्या १० दिवसांतील या दुसऱ्या मोठ्या हल्ल्यानंतर संपूर्ण दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या असून, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. या वाढत्या घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे.

हेही वाचा

भालाफेकमध्ये भारताचा ऐतिहासिक डंका! नीरज चोप्राला रौप्य, तर यशवीर सिंगला कांस्य पदक

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम परिसरातील किलम गावात शुक्रवारी हे दोन्ही मजूर काम करत असताना दहशतवाद्यांनी त्यांना अत्यंत जवळून लक्ष्य केले. या अंधाधुंद गोळीबारात दीपक नावाच्या मजूराचा जागीच मृत्यू झाला होता.

तर, भूपींदर हा मजूर गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्यावर आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button