ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागर येथे पी. के. चौकातील भुयारी मार्गासाठी ६३.५६ कोटींची निविदा

माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक नाना काटे यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील पी. के. चौकात वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारण्याच्या माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल (नाना) काटे यांच्या मागणीला गती मिळाली आहे. नाशिक फाटा–वाकड बीआरटीएस मार्गावरील या कामासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ६३ कोटी ५६ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे.

पी. के. चौकातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नाना काटे यांनी २ जानेवारी २०२५ रोजी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन दिले होते. चौकात वाहनांसाठी भुयारी मार्ग (व्हेईकल अंडरपास) उभारण्याची मागणी त्यांनी या निवेदनातून केली होती. महापालिकेने निविदा प्रसिद्ध केल्याने काटे यांच्या पाठपुराव्यातील महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे.

हेही वाचा

डिलिमीटेशन विधेयक रोखण्यासाठी काँग्रेस ‘ॲक्शन मोड’वर! राहुल गांधी, सोनिया गांधी अन् खरगे आज शरद पवार, एम.के. स्टॅलिन यांची भेट घेणार

हिंजवडी, वाकड आणि पुण्याकडे जाणारी वाहने तसेच भोसरी, चाकण आणि खेडच्या औद्योगिक परिसरातून येणारी अवजड वाहने यांमुळे पी. के. चौकावर वाहतुकीचा मोठा ताण आहे. वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे प्रवाशांचा वेळ जात असून, अपघातांच्या घटनांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

भुयारी मार्गामुळे चौकावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार आणि प्रकल्प किती कालावधीत पूर्ण होणार, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

“पी. के. चौकातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा दररोज वेळ जातो आणि त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून २ जानेवारी २०२५ रोजी महापालिका आयुक्तांकडे वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारण्याची मागणी केली होती. या कामासाठी ६३ कोटी ५६ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध होणे, हा आमच्या पाठपुराव्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. आता महापालिकेने निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करून काम सुरू करावे आणि प्रकल्प पूर्ण करण्याचे वेळापत्रक जाहीर करावे. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू राहील.”

– विठ्ठल (नाना) काटे, माजी विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group