भाजप वाहतूक सेलच्या शहर सरचिटणीसपदी सुनील (बाप्पू) कराळे यांची नियुक्ती
वाहतूक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध; रिक्षा, टेम्पो-ट्रक व्यावसायिकांच्या न्याय्य मागण्यांना प्राधान्य

पिंपरी- चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या वाहतूक सेल आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीसपदी सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय असलेले सुनील (बाप्पू) सुदामदादा कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आणि पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी आमदार महेश लांडगे यांनी कराळे यांचे अभिनंदन करत पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वाहतूक क्षेत्रातील विविध घटकांशी सातत्याने संपर्क ठेवत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा
खुड्डेमुक्त रस्ते, कोंडीमुक्त वाहतूक अन् कचरा नियोजनासाठी प्रशासनाला ‘‘डेडलाईन’’
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुनील (बाप्पू) कराळे म्हणाले, “भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने आणि आमदार महेशदादा लांडगे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन. पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालक, टेम्पो-ट्रक व्यावसायिक, अवजड वाहतूकदार आणि वाहतूक क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने आवाज उठवणार आहे. त्यांच्या प्रश्नांचे प्रशासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच भाजपचे संघटन अधिक बळकट करण्यासाठीही कटिबद्ध राहीन.”
सुनील (बाप्पू) कराळे यांच्या नियुक्तीमुळे भाजप वाहतूक सेलला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या निवडीबद्दल आमदार महेशदादा लांडगे मित्र परिवार, भाजपचे शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वाहतूक क्षेत्रातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने आणि आमदार महेशदादा लांडगे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षाचालक, टेम्पो-ट्रक व्यावसायिक, अवजड वाहतूकदार तसेच वाहतूक क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांच्या न्याय्य प्रश्नांसाठी सातत्याने लढा देईन. त्यांच्या अडचणी प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन. पक्षाचे संघटन अधिक मजबूत करत सर्वसामान्यांपर्यंत भाजपची विचारधारा पोहोचविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करेन.
– सुनील (बाप्पू) सुदामदादा कराळे, शहर सरचिटणीस, भाजप वाहतूक सेल, पिंपरी-चिंचवड.





