ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुनावळेतील डी.एस.के. कुंजबन सोसायटीच्या विधी सल्लागारपदी ॲड. मंगेश खराबे यांची नियुक्ती

अध्यक्ष अधिकराव दिवे-पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

सचिव निलेश काळे यांच्यासह व्यवस्थापन समितीच्या सदस्यांकडून अभिनंदन

सोसायटीच्या कायदेशीर कामकाजाला मिळणार अनुभवी विधिज्ञाचे मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पुनावळे येथील डी.एस.के. कुंजबन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या विधी सल्लागारपदी प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. मंगेश खराबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोसायटीच्या कायदेशीर कामकाजात अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नियमबद्धता आणण्याच्या उद्देशाने व्यवस्थापन समितीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष अधिकराव दिवे-पाटील यांच्या हस्ते ॲड. खराबे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव निलेश काळे तसेच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी बोलताना अध्यक्ष अधिकराव दिवे-पाटील यांनी सांगितले की, “सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज दिवसेंदिवस अधिक जटिल होत आहे. पुनर्विकास, सहकार कायदे, करार, सभांचे नियोजन, दस्तऐवजीकरण तसेच विविध कायदेशीर बाबींमध्ये योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. ॲड. मंगेश खराबे यांचा अनुभव आणि कायद्यावरील प्रभुत्व सोसायटीच्या कामकाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेचे प्रशासन अधिक सक्षम आणि नियमबद्ध होईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

सचिव निलेश काळे यांनी सांगितले की, “सभासदांच्या हिताचे संरक्षण, कायदेशीर विषयांवर वेळेवर सल्ला आणि संस्थेचे कामकाज कायद्याच्या चौकटीत राहून अधिक परिणामकारकपणे करण्यासाठी अनुभवी विधी सल्लागाराची आवश्यकता होती. ॲड. मंगेश खराबे यांच्या नियुक्तीमुळे सोसायटीला निश्चितच मोठा लाभ होईल.”

हेही वाचा

भाजप वाहतूक सेलच्या शहर सरचिटणीसपदी सुनील (बाप्पू) कराळे यांची नियुक्ती

ॲड. मंगेश खराबे हे विधी क्षेत्रातील अभ्यासू, युवा आणि अनुभवी वकील म्हणून ओळखले जातात. त्यांनी एलएल.एम. पदवीत विशेष प्राविण्य मिळविले असून एलएल.बी. आणि वाणिज्य शाखेतील शिक्षणही प्रथम श्रेणीत पूर्ण केले आहे. यावेळी सोसायटीच्या सर्व व्यवस्थापन समिती सदस्यांनी ॲड. मंगेश खराबे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सभासदांच्या हिताचे संरक्षण, संस्थेचे कायदेशीर सक्षमीकरण आणि पारदर्शक प्रशासन यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

ॲड. मंगेश खराबे यांचे कार्य…

विधी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे त्यांनी विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला असून अनेक पुरस्कारही मिळविले आहेत. तसेच ते पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे सदस्य असून धामवीर संभाजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे विधी सल्लागार म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. मुख्यमंत्री यांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत नवीन फौजदारी कायद्यांबाबत पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरातील हजाराहून अधिक पोलीस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. याशिवाय सायबर कायदा, महिला हक्क, पर्यायी वाद निराकरण (ADR), वाहतूक सुरक्षा तसेच विविध कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमांमध्ये ते नियमित मार्गदर्शक, व्याख्याते आणि संसाधन व्यक्ती म्हणून कार्यरत आहेत. तसेच, विविध नामांकित विधी महाविद्यालयांमध्ये मूट कोर्ट, वादविवाद स्पर्धा आणि क्लायंट काऊन्सेलिंग स्पर्धांसाठी परीक्षक म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे. कायद्याविषयी जनजागृती आणि सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी सातत्याने कार्य केले असून त्यांचा अनुभव डी.एस.के. कुंजबन सोसायटीच्या कायदेशीर कामकाजासाठी मोलाचा ठरणार असल्याचा विश्वास व्यवस्थापन समितीने व्यक्त केला.

“डी.एस.के. कुंजबन सहकारी गृहनिर्माण संस्थेने माझ्यावर विधी सल्लागार म्हणून दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी अध्यक्ष अधिकराव दिवे-पाटील, सचिव निलेश काळे आणि संपूर्ण व्यवस्थापन समितीचा मनःपूर्वक आभारी आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, कायदेशीरदृष्ट्या सक्षम आणि वादमुक्त राहावे, यासाठी आवश्यक ते विधी मार्गदर्शन देण्याचा माझा प्रयत्न असेल. संस्थेच्या प्रत्येक निर्णयामध्ये कायद्याचे पालन, सभासदांचे हित आणि सुशासनाला प्राधान्य देत व्यवस्थापन समितीसोबत समन्वयाने काम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”

– ॲड. मंगेश खराबे, विधी सल्लागार, डी.एस.के. कुंजबन सोसायटी, पुनावळे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button