बॉक्सिंगमध्ये भारताच्या लेकींचा डंका! प्रीती पवार अन् जास्मिन लम्बोरियाची सुवर्णमय कामगिरी

Commonwealth Games 2026 | ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) भारताला ज्या ऐतिहासिक सुवर्णपदकांची प्रतीक्षा होती, ती अखेर संपली आहे. भारताच्या लेकींनी बॉक्सिंगच्या रिंगणात चमकदार कामगिरी करत देशवासीयांची मान गर्वाने उंच केली आहे. आशियाई विजेत्या प्रीती पवार आणि जास्मिन लम्बोरिया यांनी आपापल्या गटात सुवर्णपदकांवर कब्जा करत भारताच्या खात्यात दोन सुवर्णपदकांची भर घातली.
महिलांच्या ५४ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात प्रीती पवारने सुरुवातीपासूनच आपले पूर्ण वर्चस्व राखले. तिने कॅनडाच्या स्कार्लेट सवाना डेलगाडो हिचा ५-० अशा एकमताने (Unanimous Decision) धुवाधार पराभव करत राष्ट्रकुल विजेतेपदाचा मान पटकावला.
Glasgow, Scotland: Indian boxer Jasmine Lamboria clinched gold medal in the Women’s 57kg category at Commonwealth Games pic.twitter.com/cCkz6ARA3y
— ANI (@ANI) August 1, 2026
हेही वाचा
पुनावळेतील डी.एस.के. कुंजबन सोसायटीच्या विधी सल्लागारपदी ॲड. मंगेश खराबे यांची नियुक्ती
सलग दोन फेऱ्यांमध्ये पूर्ण वर्चस्व
महिला ५४ किलो गटाच्या अंतिम लढतीत भारतीय बॉक्सर प्रीती पवारने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत पहिली फेरी पूर्णपणे आपल्या नावावर केली. पाचही पंचांनी तिला १०-९ असे समान गुण देऊन ५-० असा निर्णय दिला. दुसऱ्या फेरीतही प्रीतीने प्रतिस्पर्धी खेळाडूला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. या फेरीत स्कार्लेट डेलगाडोला एक पेनल्टी पॉइंट (दंड गुण) मिळाला, ज्यामुळे भारतीय बॉक्सरची आघाडी आणखी मजबूत झाली. दोन फेऱ्यांअखेर पंचांनी २०-१८ अशी गुणसंख्या देत प्रीतीचे वर्चस्व स्पष्ट केले आणि अखेर ५-० अशा दणदणीत फरकाने तिने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
जास्मिन लम्बोरियाचीही सुवर्णमयी कामगिरी
प्रीतीसोबतच भारताच्या जास्मिन लम्बोरिया हिनेही आपल्या वजनी गटात प्रतिस्पर्ध्याला नमवत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. या दोन सुवर्णपदकांमुळे भारतीय बॉक्सिंग संघाने ग्लासगो क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे.





