Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय हॉकी संघ निळ्याऐवजी केशरी रंगाच्या जर्सीत खेळणार!

Hockey Jersey | येत्या ऑगस्ट महिन्यात नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे रंगणाऱ्या ‘FIH हॉकी वर्ल्डकप २०२६’ स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघात एक मोठा आणि ऐतिहासिक बदल पाहायला मिळणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ आपल्या पारंपारिक निळ्या रंगाच्या (Blue) जर्सीऐवजी नव्या ‘केशरी’ (Orange) रंगाच्या जर्सीत मैदानात उतरणार आहेत. १५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी हॉकी इंडियाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून खेळाडूंच्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.

नव्या जर्सीचे फोटो शेअर करताना हॉकी इंडियाने लिहिले आहे की, “ही नवी डिझाइन आणि जर्सीचा रंग भारताचा अभिमान आणि नवी कथा सांगणारा आहे. भगवा (केशरी) रंग हा शौर्य, त्याग आणि विजयाचे प्रतीक आहे. उगवत्या सूर्याची प्रेरणा आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान जपणारी ही नवी जर्सी एका नव्या आणि यशस्वी सुरुवातीचे प्रतिनिधित्व करते.”

हेही वाचा

भोसरीतील तरुणांसाठी ‘‘लाईटहाऊस’’ ठरत आहे आशेचा किरण!

माजी कर्णधाराची तीव्र नाराजी

हॉकी इंडियाच्या या निर्णयावर भारतीय संघाचे माजी कर्णधार विरेन रास्किन्हा यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रास्किन्हा म्हणाले, “हॉकी इंडियाने आजवर अनेक चांगली कामे केली आहेत, पण जर्सीचा रंग बदलण्याचा हा निर्णय अत्यंत लाजीरवाणा आहे. भारतीय क्रीडा जगतात आपली ओळख ‘मॅन इन ब्लू’ अशीच आहे. मी स्वतः अनेक वर्षे अभिमानाने निळी जर्सी परिधान केली आहे. चाहत्यांनाही आपल्या खेळाडूंना निळ्याच रंगात पाहायचे आहे; मग या केशरी रंगामागे काय तर्क आहे?”

माजी खेळाडू आणि क्रीडाप्रेमींमधून होणाऱ्या टीकेनंतर हॉकी इंडियाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. पीटीआयशी बोलताना हॉकी इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या निर्णयामागे कोणतेही राजकारण नाही. आपल्या राष्ट्रध्वज (तिरंगा) मध्येही केशरी रंग आहेच, मग यात चुकीचे काय? बदलाचे नेहमीच स्वागत झाले पाहिजे.”

यासोबतच जर्सी बदलण्यामागचे तांत्रिक कारण सांगताना ते पुढे म्हणाले, “सध्या अनेक जागतिक स्पर्धांमधील टर्फ (मैदान) निळ्या रंगाचे असते. निळ्या मैदानावर निळ्या रंगाची जर्सी घातल्यामुळे मैदानातील खेळाडू आणि चेंडूवर लक्ष ठेवणे प्रेक्षकांसाठी कठीण जाते. केशरी जर्सीमुळे चांगला ‘कॉन्ट्रास्ट’ निर्माण होईल आणि खेळाडू मैदानावर स्पष्टपणे दिसून येतील.”

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button