गणेश मंडळे, ट्रस्ट आणि मंदिरांसाठी ‘SAMAVET’ची डिजिटल ई-पावती संकल्पना
देणगी व्यवस्थापनाला आधुनिक व पारदर्शक दिशा

-डिजिटल पावती, सुरक्षित नोंदी, तत्काळ WhatsApp संदेश आणि स्मार्ट व्यवस्थापनाची एकत्रित सुविधा
पुणे | प्रतिनिधी
देशभरातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वेगाने वाढत असताना, देणगी व्यवस्थापन अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने SAMAVET – India’s Community Technology Platform ने विकसित केलेली ePawati (डिजिटल देणगी पावती) प्रणाली गणेश मंडळे, मंदिरे, धार्मिक संस्था, सार्वजनिक ट्रस्ट आणि स्वयंसेवी संस्थांसाठी आधुनिक व विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येत आहे.
गणेशोत्सव, यात्रा, जत्रा, धार्मिक उत्सव तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर देणग्या स्वीकारल्या जातात. मात्र, पारंपरिक पद्धतीने देणगीची नोंद करताना कागदी पावत्या लिहिणे, पावती पुस्तके सांभाळणे, नोंदी जतन करणे, जुन्या पावत्या शोधणे आणि आर्थिक व्यवहारांचा हिशोब ठेवणे ही प्रक्रिया वेळखाऊ व खर्चिक ठरते. अनेकदा पावती पुस्तके हरवणे, नोंदी अपूर्ण राहणे किंवा आवश्यक वेळी माहिती उपलब्ध न होणे यासारख्या अडचणी संस्थांसमोर निर्माण होतात.
या पार्श्वभूमीवर SAMAVET ने विकसित केलेली ePawati प्रणाली पारंपरिक देणगी व्यवस्थापनाला डिजिटल आणि आधुनिक पर्याय उपलब्ध करून देत आहे. या प्रणालीमध्ये संबंधित संस्थेचा कार्यकर्ता देणगीदाराचे नाव, मोबाईल क्रमांक आणि देणगीची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवतो. माहिती नोंदवल्यानंतर काही सेकंदांतच देणगीदाराला संबंधित संस्थेच्या अधिकृत नावाने WhatsApp वर डिजिटल पावती आणि आभार संदेश प्राप्त होतो.
यामुळे देणगीदाराला आपल्या देणगीची तत्काळ आणि अधिकृत नोंद मिळते. त्याचवेळी संस्थेकडे प्रत्येक व्यवहाराची सुरक्षित डिजिटल नोंद उपलब्ध राहते. त्यामुळे देणगी व्यवहारांमध्ये पारदर्शकता वाढण्यास मदत होते, तसेच देणगीदार आणि संस्थेमधील विश्वास अधिक दृढ होण्याची शक्यता निर्माण होते.
हेही वाचा – पिंपरी चिंचवड शहरासाठी हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट आणि ई-आरटीएस प्रकल्पाला गती

SAMAVET प्लॅटफॉर्म केवळ देणगी व्यवस्थापनापुरता मर्यादित नसून, संस्थांच्या विविध उपक्रमांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाधारित सेवा उपलब्ध करून देत आहे. यामध्ये Event Intelligence, 24×7 Facebook आणि YouTube Live Streaming, तसेच Podcast आणि Media Production यांसारख्या सेवांचाही समावेश आहे.
गणेशोत्सव, यात्रा, धार्मिक उत्सव आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर अनेक संस्था आता डिजिटल व्यवस्थापनाचा स्वीकार करत आहेत. पारदर्शकता, तत्काळ डिजिटल पावती, सुरक्षित नोंदी, सुलभ अहवाल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एकत्रित वापर या वैशिष्ट्यांमुळे SAMAVET ची ePawati प्रणाली गणेश मंडळे, मंदिर ट्रस्ट आणि सामाजिक संस्थांसाठी डिजिटल परिवर्तनाची नवी दिशा ठरत असल्याचे चित्र आहे.

केवळ डिजिटल पावती नव्हे.. बरंच काही..!
SAMAVET ची ePawati प्रणाली केवळ डिजिटल पावती तयार करण्यापुरती मर्यादित नाही. या प्लॅटफॉर्मद्वारे संस्थांना देणगी व्यवस्थापन, सुरक्षित डिजिटल रेकॉर्ड, शोधण्यायोग्य नोंदी, विविध प्रकारचे अहवाल आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना देणगीची माहिती तपासणे, नोंदी शोधणे आणि आवश्यक अहवाल तयार करणे अधिक सुलभ होते.
पर्यावरणपूरक ‘पेपरलेस व्यवस्थापन’
डिजिटल व्यवस्थापनामुळे संस्थांचे प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान, अचूक आणि सुटसुटीत होण्यास मदत होत आहे. विशेषतः मोठ्या गणेश मंडळांना, मंदिर ट्रस्टना आणि विविध सामाजिक संस्थांना मोठ्या प्रमाणातील देणगी नोंदी व्यवस्थित ठेवण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरू शकते. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही ePawati प्रणाली महत्त्वाची ठरत आहे. डिजिटल पावत्यांचा वापर वाढल्यामुळे कागदाचा वापर कमी होण्यास मदत होते. पावती पुस्तके छापण्याचा खर्च वाचतो, कागदी नोंदींचे जतन करण्याची गरज कमी होते आणि ‘पेपरलेस व्यवस्थापन’ या संकल्पनेला चालना मिळते. त्यामुळे संस्था डिजिटल परिवर्तनासोबतच पर्यावरणपूरक उपक्रमातही आपले योगदान देऊ शकतात.





