ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपुणे

भीमाशंकर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे समाजसेवा शिबिर उत्साहात संपन्न

भीमाशंकर (ता. खेड, जि. पुणे), प्रतिनिधी : व्ही. के. माटे हायस्कूल श्रीधर नगर, चिंचवड विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे एक दिवसीय समाजसेवा शिबिर नुकतेच भीमाशंकर तालुका खेड, जिल्हा पुणे

येथे उत्साहात संपन्न झाले. शिबिरात विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि श्रमसंस्कार यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती अभियान, ग्रामस्वच्छता, श्रमदान, तसेच पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती अशा विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून स्वच्छता, पाणी बचत आणि वनसंवर्धनाचा संदेश दिला.

हेही वाचा –  गणेश मंडळे, ट्रस्ट आणि मंदिरांसाठी ‘SAMAVET’ची डिजिटल ई-पावती संकल्पना

संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीत, पथनाट्य आणि प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. भीमाशंकरच्या निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांना जैवविविधता, वन्यजीव संरक्षण आणि सह्याद्रीच्या नैसर्गिक संपदेची प्रत्यक्ष माहिती मिळाली केले.

हे समाजसेवा शिबिर विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, शिस्त, सहकार्य आणि पर्यावरणप्रेम जोपासणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.भरपूर पाऊस, भरपूर आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. समाजसेवा शिबिराचे आयोजन मोरया शिक्षण संस्थेच्या तहयात विश्वस्त, कार्यवाह , प्राचार्या मा. सौ.इंद्रायणी माटे पिसोळकर यांनी केले.समाजसेवा शिबिर यशस्वी करण्यासाठी उप मुख्याध्यापक श्री दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका सौ मैत्रेयी राजे, सहल विभाग प्रमुख सौ प्रांजली कुलकर्णी, श्री हनुमंत हुचगोळ यांनी मेहनत घेतली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button