Breaking-newsपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास “क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया” कडून “ए” श्रेणीचे मानांकन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास “‘क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI)” अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय शिक्षण व प्रशिक्षण मान्यता मंडळ (NABET) तर्फे २०२५-२६ या वर्षासाठीच्या देशांतर्गत महाविद्यालयांच्या गुणवत्तामापन व क्रमांकन मूल्यांकन प्रक्रियेत महाविद्यालयास मानाचे ‘A’ श्रेणीचे मानांकन प्राप्त झाले आहे.

हेही वाचा – व्ही.के. माटे हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिन संपन्न

क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) ही भारत सरकार आणि भारतीय उद्योग क्षेत्राच्या संयुक्त पुढाकारातून स्थापन झालेली, विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता संवर्धन, गुणवत्ता आश्वासन, मानकीकरण आणि उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणारी राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मान्यता प्रदान करणारी संस्था आहे. NABET (एनएबीइटी) मार्फत शैक्षणिक संस्थांचे विविध ११ गुणवत्ताविषयक निकषांवर मूल्यमापन करून त्यांना मानांकन प्रदान केले जाते.

एनबीए,नॅक च्या उत्कृष्ट श्रेणी मिळवल्यानंतर या देशव्यापी मानांकनांच्या प्रथम वर्षीच “ए”श्रेणी मिळाल्यामुळे महाविद्यालयाच्या अष्टपैलू प्रगतीवर एक प्रकारचे शिक्कामोर्तब झाले आहे.या महत्त्वपूर्ण यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे म्हणाले, “हे मानांकन महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, कौशल्यविकास आणि सर्वांगीण विद्यार्थी विकासासाठी असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची व दृढ बांधिलकीची साक्ष आहे.

या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेला आणि गुणवत्ता संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून त्यामुळे महाविद्यालयाच्या सर्व घटकांचा आनंद व आत्मविश्वास वाढला आहे.या मानांकन प्राप्तीनिमित्त संकुल संचालक रीअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी महाविद्यालयातील सर्व अंतर्गत व बाह्य भागधारकांचे अभिनंदन केले. संस्थेचे विश्वस्त श्री तेजस पाटील यांनी विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम यांवर भर देणाऱ्या उपक्रमांसाठी तर उपाध्यक्ष श्री सतेज पाटील यांनी सातत्यपूर्ण कामगिरीचे विशेष कौतुक केले व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात..!

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button