Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

‘भूतम भयम्’ तील ‘हॅपी न्यू इयर’ गाण्याची प्रेक्षकांमध्ये क्रेझ! मिका सिंगच्या दमदार आवाजाला भरभरून दाद

Bhootam Bhayam : प्रदर्शनानंतर सर्वत्र सकारात्मक प्रतिसाद मिळवत असलेला ‘भूतम भयम्’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चित्रपटातील प्रत्येक पैलूचं कौतुक होत आहे. थरार आणि विनोदाचा अनोखा मिलाफ, भव्य सेट्स, उत्कृष्ट व्हिज्युअल्स, कलाकारांचा दमदार अभिनय आणि मनोरंजक कथा यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. चित्रपटातील ‘हॅपी न्यू इयर’ हे गाणंही सध्या सोशल मीडियावर आणि प्रेक्षकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक मिका सिंग यांच्या दमदार आणि जोशपूर्ण आवाजाने सजलेलं हे गाणं प्रत्येक सेलिब्रेशनसाठी परफेक्ट ठरत असून श्रीनाथ म्हात्रे यांच्या एनर्जेटिक संगीताला आणि खंडेराव यांच्या शब्दांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी या गाण्याची विशेष दखल घेतली असून, थिएटरमधून बाहेर पडताना हे गाणं गुणगुणताना ते दिसत आहेत. यंदाच्या नवीन वर्षाच्या पार्टीत हे गाणं हमखास वाजणार हे नक्की! या गाण्याचं आणखी एक आकर्षण म्हणजे लोकप्रिय युट्यूबर श्रीमान लिजेंड अर्थात सिद्धांत जोशी यांची खास उपस्थिती. त्यांच्या एन्ट्रीमुळे गाण्याची रंगत आणखी वाढली असून, तरुण प्रेक्षकांकडून त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

गायक मिका सिंग म्हणाले, ‘’ ‘हॅपी न्यू इयर’ गाताना मला खूप मजा आली. या गाण्यातील एनर्जी, बीट्स आणि सेलिब्रेशनचा माहोल इतका भन्नाट आहे की, रेकॉर्डिंग करतानाच त्याची धमाल जाणवत होती. मला खात्री आहे की, हे गाणं प्रत्येक पार्टीची शान वाढवेल.” श्रीमान लिजेंड उर्फ सिद्धांत जोशी म्हणाले, ‘’ ‘भूतम भयम्’ सारख्या मोठ्या चित्रपटाचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास अनुभव आहे. ‘हॅपी न्यू इयर’च्या चित्रीकरणादरम्यान संपूर्ण टीमसोबत खूप धमाल आली आणि प्रेक्षकांनाही हीच मजा गाण्यातून नक्की अनुभवायला मिळेल.’’

हेही वाचा –  ‘प्रधानमंत्री जन धन योजना’ ठरली आर्थिक समावेशनाचा मजबूत स्तंभ: ‘डीपीयू’चा संशोधन अहवाल

याबद्दल दिग्दर्शक रामचंद्र अरुण गांवकर म्हणाले, “ ‘हॅपी न्यू इयर’ हे गाणं त्या मनोरंजनाचा सर्वात रंगतदार भाग आहे. या गाण्याच्या चित्रीकरणापासून ते संगीतापर्यंत प्रत्येक गोष्टीत भव्यता आणि ऊर्जा जपण्याचा प्रयत्न केला आहे. मिका सिंग यांच्या आवाजामुळे गाण्याला वेगळीच ओळख मिळाली असून, श्रीमान लिजेंड आणि ऑरेंज ज्यूस गँग यांच्या सहभागामुळे त्यात एक फ्रेश आणि युवा रंग भरला आहे.”

चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं, भव्य सेट्सचं आणि दर्जेदार तांत्रिक बाजूचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. हॉरर आणि कॉमेडीचा समतोल साधत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘भूतम भयम्’ हा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासारखा भव्य मनोरंजनपट असल्याचं मत अनेक प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्स निर्मित ‘भूतम भयम्’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार आणि महेश ज्ञानदेव कोरडे यांनी केली असून, चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले आहे. चित्रपटात ऑरेंज ज्यूस गँग अर्थात करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, सिद्धांत सरफरे आणि शुभम जाधव यांच्यासह पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम यांच्यामहत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा चित्रपट यशस्वी वाटचाल करत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button