व्ही.के. माटे हायस्कूलमध्ये कारगिल विजय दिन संपन्न

पुणे : दिनांक 26 जुलै रोजी कारगिल विजयदीन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली .कारगिल युद्धात शौर्य गाजवणाऱ्या वीर जवानांना अमर ज्योत प्रज्वलित करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .तसेच एमसीएफ च्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, कविता ,सादर करून भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम केला .
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह, तहयात विश्वस्त ,प्राचार्य मा.सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर यांनी भारतीय सैनिकांचे कारगिल युद्धातील अतुलनीय साहस त्याग याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी हवाई दल अधिकारी मा. श्री नंदू सारंग, प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर श्री .प्रताप भोसले यांनी कारगिल युद्धाचा इतिहास, देशप्रेम बलिदान याबद्दल सविस्तर माहिती देऊन युद्धातील प्रसंग सांगितले आणि विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती होऊन देश सेवा करण्याचे आवाहन केले.
हेही वाचा – भीमाशंकर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे समाजसेवा शिबिर उत्साहात संपन्न

अभ्यासाबरोबरच आपले शारीरिक स्वास्थ्य चांगले ठेवणे कसे आवश्यक आहे हे त्यांच्या अनुभव कथनातून सांगितले. प्रमुख पाहुणे ब्रिगेडियर श्री. प्रताप भोसले यांनी युद्धाच्या प्रसंगांचे अनुभव मनोरंजक रित्या सांगून विद्यार्थ्यांची संवाद साधला
कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक श्री. दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका सौ मैत्रेयी राजे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनिता बोरसे यांनी केले आभार प्रदर्शन सौ. मनीषा उजंळबकर,तर कार्यक्रमाची सांगता क्रीडाशिक्षक श्री. पंकज देव यांनी वंदे मातरम ने केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.





