Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

रवी राणांनी शिस्तीत भाजपचा ‘गेम’ केला; यशोमती ठाकूर यांची भाजपवर टीका

Yashomati Thakur | अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपने २५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला महायुतीतील घटक पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. भाजपच्या या कामगिरीवर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेसच्या नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

निवडणुकीपूर्वी भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, ऐनवेळी ही युती तुटली. त्यानंतर युवा स्वाभिमान पक्षाने तब्बल ३४ जागांवर उमेदवार उभे केले. अनेक प्रभागांमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले होते. तसेच भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी काही ठिकाणी भाजपच्या अधिकृत उमेदवारांऐवजी युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याची चर्चा झाली. यामुळे भाजपमध्ये नाराजीही व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल २० जागा कमी मिळाल्या. याच मुद्द्यावरून यशोमती ठाकूर यांनी भाजपला टोला लगावला आहे.

हेही वाचा       :              जनमत चाचणीची आठवण जपणारा गोवा अस्मिता दिन साजरा

यशोमती ठाकूर म्हणाल्या, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने शिस्तीत राहून भाजपचा ‘गेम’ केल्याचे आम्हाला दिसले. अमरावती महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे. भाजप युवा स्वाभिमान पक्षासमोर लाचार होणार आहे. अमरावतीत ‘लंगडी’ सत्ता स्थापन होताना आम्हाला दिसत आहे. भाजपकडे सर्व साधनसंपती, धनसंपत्ती, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या १९ सभा, जिल्ह्यातील सर्व आमदार वार्डनिहाय कामाला लागलेले, संपूर्ण ‘सिस्टिम’ भाजपसाठी काम करीत होती. पण, अमरावतीच्या जनतेने भाजपला कौल दिलेला नाही. हा कौल भाजपच्या विरोधातील आहे, ही वस्तुस्थिती आहे. अमरावतीची लढाई ही जनशक्ती विरूद्ध धनशक्ती अशीच झाली आहे.

युवा स्वाभिमान पक्षाने भाजपला झुकवले आहे. भाजपने सर्व शक्ती पणाला लावून निवडणूक लढवली. धनसंपत्तीचा वापर केला. मोठा गाजावाजा करण्यात आला. जिल्ह्यातील आणि शेजारील जिल्ह्यांमधील भाजपचे आमदार वार्डनिहाय नियोजनासाठी बोलावण्यात आले. काही ठिकाणी भाजपचे उमेदवार फार थोड्या मतांनी पराभूत झाले, या उमेदवारांच्या मतांची फेरमोजणी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामी लावण्यात आली, तरीही भाजपला जनतेने नाकारले आहे. आता भाजपला रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षासमोर झुकण्याखेरीज पर्याय उरलेला नाही, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button