ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन-PCMC : डॉ. सुहास कांबळे यांच्या उमेदवारीचे सर्वस्तरातून ‘वेलकम’

आमदार महेश लांडगे यांचा ‘विनिंग कॅन्डिडेट’ : भारतीय जनता पार्टीचा प्रोफेशनल उमेदवार


Deprecated: preg_split(): Passing null to parameter #3 ($limit) of type int is deprecated in /home/mahaenews/public_html/wp-content/themes/jannah/framework/functions/post-functions.php on line 805

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ साठी प्रभाग क्रमांक ८ मधून प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. सुहास कांबळे यांना भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वस्तरातून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत होत आहे. आरोग्यसेवेत प्रदीर्घ काळ केलेले योगदान, प्रामाणिक कार्यशैली आणि समाजाशी असलेली घट्ट नाळ यामुळे डॉ. कांबळे यांची उमेदवारी ‘विनिंग कॅन्डिडेट’ म्हणून ओळखली जात आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली डॉ. कांबळे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला असून, पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकत प्रभाग क्रमांक ८ मधून उमेदवारी दिली आहे. “डॉ. सुहास कांबळे हे केवळ डॉक्टर नाहीत, तर समाजाशी बांधिलकी जपणारे प्रोफेशनल व्यक्तिमत्त्व आहेत.

डॉ. सुहास कांबळे यांचा जन्म बेळगाव येथे झाला असून शिक्षण पुण्यात झाले. बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथून एम.बी.बी.एस. व एम.एस. (ऑर्थोपेडिक्स) पदवी घेतल्यानंतर त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. भोसरी येथील चार खाटांच्या छोट्या रुग्णालयापासून आज १०० खाटांच्या अत्याधुनिक साईनाथ हॉस्पिटलपर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्ष, गुणवत्ता आणि सेवाभावाचा आदर्श ठरला आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हाडांच्या शस्त्रक्रियेत त्यांनी नवे मानदंड प्रस्थापित केले असून हजारो रुग्णांना वेदनामुक्त जीवन दिले आहे.

आरोग्यसेवेपलीकडे जाऊन समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याच्या उद्देशाने डॉ. कांबळे यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला आहे. आरोग्य, स्वच्छता, पायाभूत सुविधा, महिला व युवकांसाठी सुरक्षित प्रभाग, तसेच पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन ही त्यांची प्रमुख प्राधान्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत येणाऱ्या जय गणेश साम्राज्य, जलवायु विहार, केंद्रीय विहार, पीएमआरडीए सेक्टर १२, संत नगर, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर आदी भागातील नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण आहे. विविध सामाजिक, व्यावसायिक व युवक संघटनांनीही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

“डॉक्टर म्हणून ज्या निष्ठेने रुग्णसेवा केली, त्याच प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणूनही सेवा देईन,” असा विश्वास डॉ. सुहास कांबळे यांनी व्यक्त केला. एकूणच, भाजपाचा हा प्रोफेशनल उमेदवार प्रभाग क्रमांक ८ मध्ये विकासाची नवी दिशा देईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

“डॉक्टर म्हणून मी प्रामाणिकपणे रुग्णांचे दुःख कमी केले; लोकप्रतिनिधी म्हणूनही प्रत्येक नागरिकाच्या प्रश्नांवर तितक्याच संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करेन. आरोग्य, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा या प्रत्येक नागरिकाचा हक्क आहेत. प्रभाग क्रमांक ८ चा सर्वांगीण विकास हीच माझी प्राथमिकता असेल.
– डॉ. सुहास कांबळे, प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ.
उमेदवार, भाजपा, प्रभाग- 8 इंद्रायणीनगर-भोसरी. 


Deprecated: preg_split(): Passing null to parameter #3 ($limit) of type int is deprecated in /home/mahaenews/public_html/wp-content/themes/jannah/framework/functions/post-functions.php on line 805
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button