Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“दिशाभूल करणाऱ्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही “; नीलम गोऱ्हे कडाडल्या; कोणाला दिला इशारा?

Share On

पुणे :  शिवसेनेला कमी जागा मिळतील, आम्हाला युती नको अशी दिशाभूल शिवसैनिकांची करू नये. जे कोणी जाणीवपूर्वक अशाप्रकारे दिशाभूल करीत असेल त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. शिवसैनिकांना चांगली संधी मिळत असेल आणि सन्मानजनक युती होत असेल तर कोणीही संभ्रमावस्था निर्माण करू नका, असा सल्लाही डाॅ. गोऱ्हे यांनी दिला.

हिवाळी अधिवेशनातील कामकाजाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेला केवळ ८ जागा मिळतील त्यामुळे अनेक शिवसैनिक नाराज झाले असून, राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे युती करणार की नाही, असे प्रश्न शिवसेनेच्या नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांना पत्रकारांनी विचारले असता, डाॅ. गोऱ्हे यांनी कोण म्हटले आठ जागा मिळणार.

महायुतीची एकच बैठक झाली. त्यामध्ये सन्मानजनपूर्वक युती करण्याचे ठरले आहे. त्यामध्ये जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे असताना विनाकारक शिवसैनिकांमध्ये संभ्रमावस्था पसरवणे चुकीचे आहे. मुद्दामून कोणी असे प्रकार करीत असतील, तर त्यांचा समाचार घेतल्याशिवय राहणार नाही, असेही डाॅ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा –  वैद्यकीय अधिकार्‍यांची समुपदेशनाद्वारे पदोन्नती; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. जवळपास चारशेहून अधिक इच्छुकांनी मुलाखत दिली. त्यानुसार कोणत्या प्रभागामध्ये आपले प्राबल्य आहे. उमेदवाराची ताकद यांसह अन्य बाबींचा अभ्यास करून पुणे शहरात किती जागा लढविणार याबाबतची माहिती आणि इच्छुक उमेदवारांची सविस्तर यादी २२ डिसेंबरपर्यंत पक्षश्रेष्ठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये पदाधिकारी आणि शिवसैनिकांची मते विचारात घेऊनच किती प्रभागात जागा मागणे योग्य राहील हे ठरेल, असे डाॅ. गोऱ्हे यांनी सांगितले.

भाजपा-शिवसेना युतीत शिवसेनेला केवळ आठच जागा मिळणार, युतीचा फटका शिवसेनेला बसणार, शिवसैनिकांना न्याय मिळणार नाही अशा तक्रारी करीत काही शिवसैनिकांनी सकाळी शिवसेनेचे पुणे शहर पदाधिकारी व माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयावर गर्दी केली.

तसेच, आम्हाला संधी मिळणार नसेल तर आम्ही राजीनामे देतो, असा पवित्रा घेतल्याचे समोर आले. त्यामुळे शिवसेनेतील नेते ही परिस्थिती कशी हाताळणार, नाराज शिवसैनिकांची मनधरणी कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा  

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button