Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

धानोरीत रविवारी मॅरेथॉन स्पर्धा; पर्यावरण संवर्धनाचा दिला जाणार संदेश

पुणे : धानोरी परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रविवारी सकाळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे मुख्य संयोजक माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे असून माता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या स्पर्धेला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आयुक्त नवल किशोर राम तसेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मॅरेथॉनसाठी आतापर्यंत १२ हजार नागरिकांनी नोंदणी केली असून प्रत्यक्षात जवळपास १० हजार नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेची सुरुवात रविवारी सकाळी ६:३० वाजता धानोरी जकात नाका येथून होईल. धानोरी–विश्रांतवाडी मार्गे, विठ्ठल मंदिरजवळून पुढे धानोरी डोंगरावरील वन उद्यान येथे स्पर्धेची सांगता होणार आहे.

हेही वाचा –  पंचतारांकित हॉटेलमधील कामगार नोंदणीवरुन वरळीमध्ये भाजप-ठाकरे गट आमने-सामने

वन उद्यान येथे सकाळी ७:३० वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येईल. पारितोषिक वितरणानंतर समारोपाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश अधिक प्रभावीपणे देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जाणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button