Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुरंदरमध्ये अनधिकृत प्लॉटिंगवर पीएमआरडीएची धडक कारवाई !

बेकायदा कृत्यांना लगाम: सहआयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांची माहिती

पुणे : पुरंदर तालुक्यात वाढत्या अनधिकृत प्लॉटिंगला आळा घालण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुरू केलेल्या मोहीमेला जोरदार प्रतिसाद मिळत असून, १९ नोव्हेंबरपासून सलग कारवाई सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत तीन गावांतील अनधिकृत प्लॉटिंगवर हातोडा पडला आहे. ही मोहीम सोमवारी (दि. २४)देखील सुरुच राहणार असल्याची माहिती सहआयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी दिली.

अनधिकृत प्लॉटिंगमुळे होत असलेल्या नागरिकांच्या फसवणुकीविरोधात पीएमआरडीएला मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींना गांभीर्याने घेत प्राधिकरणाने पुरंदर तालुक्यातील १५ गावांचे सर्वेक्षण पूर्ण केले. त्यानंतर अनधिकृत प्लॉटिंगविरोधात मोठ्या प्रमाणावर मोहीम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा –  जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाची पहाट; शंकराचाऱ्यांच्या उपस्थितीत घटस्थापना

गेल्या दोन दिवसांत मौजे देवडी (गट क्र. १७०), मौजे आंबोडी (गट क्र. १५९), तसेच मौजे काळेवाडी (गट क्र. १७०६) येथील बेकायदेशीर प्लॉटिंग, अंतर्गत रस्ते आणि डिमार्केशन पोल यांचे निष्कासन करण्यात आले. या गावांतील शंकर बाठे, निखिल बोरकर, यशोदीप बोरकर तसेच गुलाब झेंडे / कातोबा डेव्हलपर्स (गणेश पार्क) यांच्या अनधिकृत कामांवर कारवाई झाली.

नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक…

ही मोहीम महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला आणि पोलिस अधीक्षक (दक्षता अधिकारी) अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. सहआयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील, उपायुक्त किरणकुमार काकडे, तहसीलदार आशा होळकर, तसेच शाखा अभियंते प्रितम चव्हाण, शशिभूषण होले, शरद खोमणे, हरीष माने, प्रमोद सोनवणे व संकेत बडे यांनी ही कारवाई अंमलात आणली. शासनाची कोणतीही परवानगी न घेता ले-आऊट तयार करून तात्पुरते रस्ते दाखवण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. अशा अनधिकृत प्लॉट्सना बांधकाम परवानगी मिळत नसल्याने प्लॉट खरेदी करताना सर्व कागदपत्रांची काटेकोर तपासणी करावी, असे आवाहन सहआयुक्त डॉ. सूर्यवंशी-पाटील यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button