Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पूरग्रस्त बांधवांची दिवाळी होणार गोड!

आतिश बारणे यांचा पुढाकार; राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदतीचा हात

Share On

पिंपरी चिंचवड  : मराठवाड्यासह सोलापूर, करमाळा भागामध्ये पावसामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली असून, शेतकरी बांधव सर्व काही गमावून बसला आहे. ऐन दसरा दिवाळीच्या तोंडावर या संकटात सापडलेल्या आपल्या बळीराजाला मदतीचा हात पुढे करत पूरग्रस्त बांधवांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आतिश बारणे यांनी घेतला आहे.

हेही वाचा –  ‘२०२७ पर्यंत भारत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल’; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अतिश बारणे यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांसाठी 1000 मदतीचे किट वाटप करण्यात येणार आहे.या मदत किटमध्ये अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, स्वच्छतेसाठी साहित्य आणि वैद्यकीय सामग्रीचा समावेश आहे. तसेच दिवाळीसाठी वस्तू देखील देण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीची मदत मिळावी, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे आतिश बारणे यांनी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात शेतकरी, नागरिक संकटात आहेत. दसरा दिवाळीच्या तोंडावर संकटात असलेल्या आपल्या या बांधवांना दिलासा देऊन मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. संकटाच्या काळात एकमेकांना मदतीचा हात देणं ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. यामध्ये खारीचा वाटा उचलत आपल्या बांधवांना सावरण्याचे काम हाती घेतले आहे.

– आतिश बारणे,उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button