ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी–पिंपरी मेट्रो कामामुळे रस्त्यावर खड्ड्यांचा कहर!

नागरिक त्रस्त; अपघातांची शक्यता वाढली, तातडीने दखल घेण्याची मागणी

पिंपरी चिंचवड : निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. विशेषत: निगडी भक्ती शक्ती उड्डाणपूल ते अंकुश चौक आणि श्रीकृष्ण मंदिर सेवा रस्त्यावर गेल्या दोन महिन्यांपासून मोठे खड्डे खोदून ठेवले असून, पावसामुळे पाणी साचल्याने ते दिसत नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अंकुश चौक ते निगडी प्राधिकरण पोलिस स्टेशन भुयारी मार्ग रस्ता बंद केल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. याशिवाय दिशादर्शक फलकांचा अभाव व ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती न केल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली आहे.

हेही वाचा      :          मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

स्थानिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देत खड्डे बुजवण्याची, रस्ते सुरू करण्याची आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे अधिकारी रस्त्यांवर खोदकाम करून त्याची योग्य देखभाल करत नाहीत, त्यामुळे श्रीकृष्ण मंदिर परिसरातील हालचाल बाधित होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button