Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कराटेपटू भजेश सवरे याला १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

शिक्षण विश्व: GEMS Sports Departmentच्या मार्गदर्शनाखाली मिळवले यश

पुणे | गायत्री इंग्लिश मीडियम स्कूल, मोशी येथील विद्यार्थी भजेश सवरे याने पुणे जिल्हा क्रीडा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली.

या स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आले होते. भजेशने विविध तालुक्यांतील सक्षम प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळताना उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि धैर्य दाखवले. अंतिम फेरीत दमदार कामगिरी करत त्याने सुवर्णपदक आपल्या नावे केले.

हेही वाचा      :      वेस्ट टू वंडर थीम पार्कचे काम दोन महिन्यात पूर्ण करा

भजेश सवरेच्या या यशामध्ये गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडा विभागाचे विशेष योगदान आहे. या विभागातील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने सातत्याने मेहनत घेतली असून त्याचे हे यश प्रेरणादायी ठरत आहे. या विजयामुळे भजेशला आगामी विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी मार्ग मोकळा झाला आहे. शाळेच्या वतीने त्याचे व प्रशिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

आमच्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा आणि सांघिक शिस्तीच्या क्षेत्रातही प्रगती करावी, हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. भजेश सवरे याने मिळवलेले हे यश केवळ शाळेच्या नव्हे तर संपूर्ण संस्थेच्या शिस्तप्रिय, मेहनती आणि गुणवत्तापूर्ण कार्यपद्धतीचे प्रतिक आहे. अशा विद्यार्थ्यांमुळे संस्थेचा नावलौकिक दिवसेंदिवस वाढत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यातही अशा अनेक हुशार आणि क्रीडागुण संपन्न विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे.

– विनायक भोंगाळे, संस्थापक.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group